
पुणे: उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आली होती. .यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी व 13 खासदारांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला होता. यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकारही कोसळले. पण या बंडखोरीमागे नेमकं कोण होतं, याची सुरुवात कुठे झाली होती याबाबत आजही अनेक संभ्रम आहे. मात्र, आता शिंदे गटातील एका नेत्यानं खळबळजनक दावा केला आहे. (Mahavikas Aaghadi was already done before election)
माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेतील बंडखोरीवर मोठं विधान केलं आहे. शिवतारे यांनी मीच एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचं बीज पेरलं होतं असा दावा केला आहे.
शिवतारे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. त्यामुळे दोन महिन्यातच मी नंदनवनला गेलो होतो. तिथे शिंदेंसोबत साडेचार तास चर्चा केली. यावेळी मी त्यांना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा, हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे.
तसेच महाविकास आघाडी ही निवडणुकीनंतर नाही तर आधीच झाली होती. हे आता लोकांना फसवत आहेत. निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीशी सेटलमेंट झाली होती. कोणत्या सीट पाडायच्या, कोणत्या विजयी करायच्या आणि आकडेवारी कशी जुळवून आणायची हे कटकारस्थान निवडणुकीआधीच झालं होतं असा दावाही शिवतारे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 70 सीट घालवल्या...
उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनंही शिवसेनेचे मंत्री पाडले. त्यामुळे ठाकरे यांनी शिवसेनेच्या 70 सीट घालवल्या. हे सर्व त्यांच्यामुळेच झालं. निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीशी सेटलमेंट झाली होती असा आरोपही विजय शिवतारे यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.