अनिल परब तर अडकलेच सोबत सदानंद कदमही सापडले...

परिवहन खात्यातील अधिकाऱ्याच्या सांगली, बारामती (Baramati), पुणे (Pune) येथील मालमत्तांवर छापे टाकण्यात आले.
Anil Parab
Anil Parab Sarkarnama

मुंबई : परिवहन खात्यातील अधिकाऱ्याच्या सांगली, बारामती (Baramati), पुणे (Pune) येथील मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. त्या वेळी या अधिकाऱ्याचे अनेक उद्योग लक्षात आले. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) हे छापे अधिकाऱ्यांवर टाकले असले तरी त्यामध्ये राज्याचे परिनहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचेही अनेक अपारदर्शक व्यवहार, व 'मनी लॅंड्रींग'मध्ये सहभागी असल्याचे आढले असल्याचा दावा, भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

या संदर्भात सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, आयकर विभागाच्या धाडींचे परिणाम: अनिल परब, सदानंद कदम आणि बजरंग खारमाटे हे कोट्यावधींची रोकड, अपारदर्शक व्यवहार, व मनी लॅंड्रींगमध्ये सहभागी असल्याचे आढळले.'' ED ने सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने सुद्धा फौजदारी खटला दाखल केला, असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

आयकर विभागाच्या शोध मोहिमेमध्ये दापोली येथील जमिनीचा एक व्यवहार समोर आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील एका प्रतिष्ठित राजकारण्याने 2017 मध्ये 1 कोटी रुपयाच्या मोबदल्यात जमीन खरेदी केली होते. मात्र, त्या जमीनीची नोंदणी 2019 मध्ये झाली. ही जमीन पुन्हा एकदा 2020 मध्ये 1 कोटी 10 लाखाला केबल ऑपरेटरला विकली गेली. याच जमिनीवर 2017 ते 2020 या काळात रिसॉर्ट बांधण्यात आले, असा दावा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

Anil Parab
आता बोगस सोमय्यांचाही राष्ट्रवादीला त्रास; मागवली आरटीआयखाली माहिती...

त्या राजकारण्याच्या नावावर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झाले होते. नंतर 2020 मध्ये जेव्हा राजकारण्याने केबल ऑपरेटरला मालमत्ता विकली तेव्हा रिसॉर्ट जवळजवळ पूर्ण झाले होते. तपासात असे दिसून आले आहे की रिसॉर्टच्या बांधकामाविषयीची संबंधित नोंदणी अधिकाऱ्यांना कळवण्यात आली नव्हती. 2019 आणि 2020 मध्ये जेव्हा या जमीनीचा व्यव्हार झाला. त्यावेळी केवळ जमिनीच्या नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क भरण्यात आले होते, असे आयकर विभागाला सापडलेल्या पुराव्यांवरून दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्ये सुरू झाले. रिसॉर्टच्या बांधकामासाठी 6 कोटी रुपये रोख खर्च करण्यात आले. त्याच्या बांधकामाच्या खर्चाच्या नोंदी सबंधीत व्यक्तीने आणि त्या राजकीय व्यक्तीने ठेवलेल्या नाहीत.

अधिकाऱ्यांचे अनेक कारनामे आयकर विभागाने शोधून काढले आहेत. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन, सरकारी ठेकेदारी, मालमत्ता भाड्याने देणे यात हा अधिकारी गुंतल्याचे प्राप्तिकर विभागाच्या लक्षात आले. तनिष्का सारखे शोरुम या अधिकाऱ्याच्या जागेत आहे. त्याचे मोठे भाडे त्याला मिळते. तसेच बारामती आणि पुणे येथे एक बंगल आणि फार्महाऊस आहे. तासगाव येथे दुसरे मोठे लॅव्हिश फार्महाऊसपण प्राप्तिकर विभागाला आढळले.

Anil Parab
विरोधी पक्षनेते अडचणीत! आमदारांना इनकम टॅक्सच्या छाप्यांची धमकी दिल्यानं हक्कभंग

या अधिकाऱ्याचा कन्स्ट्रक्शन व्यवसाय त्याचे नातेवाईक सांभाळत असल्याचे निष्पन्न झाले असून या कंपनीला सरकारी कामेही मिळाली आहेत. कामाच्या खर्चात बोगस बिले देऊन आणि महागाई दाखवून सुमारे 27 कोटी रुपयांची जादा रक्कम वसूल केल्याचे या तपासणीत सापडले. बारामतीतील जमीन विक्रीचा दोन कोटी रुपयांचा बेहिशोब रोख व्यवहारही दिसून आला आहे. सुमारे 66 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. डिजिटल आणि कागदोपत्रे हस्तगत करण्यात आले पुढील तपासासाठी त्यांचे विश्लेषण सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in