देशमुख-मलिकांना उच्च न्यायालयाचा दणका; मतदानाची परवानगी नाकारली

Rajya sabha Elelction 2022 | Anil Deshmukh| Nawab Malik | राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
Anil Deshmukh| Nawab Malik
Anil Deshmukh| Nawab Malik

Rajya sabha Elelction 2022

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांना (Nawab Malik) राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी ही मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर उच्च न्यायालयाने (Court) कायम ठेवला आहे. दरम्यान याचिकेतील जामिनाचा मुद्दा वगळून केवळ बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळवी अशी मागणी नवाब मलिक यांच्या वतीने करण्यात आली होती.

मनी लॉण्ड्रिग प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी राज्यसभेच्या मतदानासाठी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. मात्र न्यायालयानेराज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे. नवाब मलिक यांच्या याचिकेवरच सकाळी सुनावणी होऊन अद्याप कोणताही सकारात्मक आदेश आलेला नाही. यावर थोड्या वेळाने पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना देखील मतदानाची संधी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

Anil Deshmukh| Nawab Malik
Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे नाराज ? मतदानाकडे पाठ

अशातच नवाब मलिक यांच्या वतीने याचिकेतील जामिनाचा मुद्दा वगळून बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी मलिक यांच्याकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सत्र न्यायालयाने गुरुवारी परवानगी नाकारल्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच मतदानासाठी आपल्याला एक दिवसाचा जामीन मंजूर करावा किंवा पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. राज्यसभेच्या निवडणूकीच मतदान प्रक्रिया शुक्रवारी (१० जून) होणार असल्याने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची देशमुख-मलिक यांची विनंतीही न्यायालयाने मान्य केली होती. मात्र न्यायालयाने यावर अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे मलिकांप्रमाणे अनिल देशमुख यांनाही मतदानाची परवानगी मिळण्याची शक्यता नाही, असेच दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com