मुख्यमंत्री शिंदेंचे सेनेला पुन्हा टेन्शन : आणखी किती आमदार फुटतील सांगता येत नाही..

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi Newssarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिली कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला (ShivSena) इशारा दिला. माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांना फोडायचे बरेच प्रयत्न केले. पण कोणीही फुटला नाही. माझ्याकडचे 50 आणि भाजपचे 120 अशा 170 आमदारांचा भक्कम पाठिंबा आहे. आणखी किती आमदार येतील, हे सांगता येत नाही, असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचा सूत्रे स्वीकारल्यानंतर शिंदे हे तातडीने गोव्याला रवाना झाले. तेथील आपल्यासोबत असलेल्या आमदारांना घेण्यासाठी ते तिथे गेले आहेत. त्यांच्यामुळेच आपण हितपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले.

कॅबिनेट बैठकीच्या वेळी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांचे मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्वागत केले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठाधिकारी यांच्याशी संवाद साधताना शिंदे म्हणाले," आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही. राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते, ही एका रथाची दोन चाके आहेत.

Eknath Shinde Latest Marathi News
फडणवीस नाराज दिसत होते, हे शरद पवारांनीही टिपले..

लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे. असा संदेश जाणे मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे म्हत्वाचे आहे. महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया" मोठा पक्ष असूनही भाजपने (BJP) आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठे मन दाखवले आणि मला मुख्यमंत्रीपदी बसविले, अशा शब्दांत शिंदे यांनी आभार मानले.

Eknath Shinde Latest Marathi News
शिंदेंनाही वाटलं नसेल की मुख्यमंत्री पद मिळेलं

दरम्यान, आधी फडणवीसांनी सांगितेल होते की ते सरकारमध्ये सहभागी होणार नाहीत. मात्र, त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना पद स्विकारण्यास सांगितले. त्यामुळे या निर्णयावरुन सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटिवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते सत्तेसाठी काम करत नाही. देवेंद्रजींचे मन विशाल आहे. त्यामुळे पक्षाने जे सांगितले होते, तेच देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे मुनगंटिवार यांनी सांगितले. फडणवीस हे आधी बाहेर राहणार होते. मात्र, त्यांच्या पाच वर्षाचा अनुभवाचा फायदा शिंदे सरकारला व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे मुनगंटिवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com