APMC Election Politics : मुंबई बाजार समितीवरील राजकीय प्रशासकीय मंडळाचे स्वप्न भंगणार...

सहकार आणि बाजार समित्यांसारख्या आर्थिक सत्ता केंद्रावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे
Mumbai APMC:
Mumbai APMC: Sarkarnama

Mumbai Bajar Samiti News Update : मुंबई बाजार समितीसारख्या ((Mumbai APMC) आर्थिक सत्ता केंद्रावर सनदी अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे राजकीय कार्यकर्त्यांचे आर्थिक सत्ता केंद्रावर जाण्याचे स्वप्न भंगणार आहे. (The dream of the political administrative board on the Mumbai market committee will be shattered)

राज्यातील विविध स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी रखडलेल्या आहेत. यामुळे विविध संस्थांवर प्रशासकिय राजवट असून, या राजवटीचा फायदा सरकारमधील पक्षांना होतो आहे. याचाच एक भाग म्हणुन ग्रामिण महाराष्ट्राशी संलग्न असलेल्या बाजार समित्यांसारख्या आर्थिक सत्ता केंद्रावर ताबा मिळविण्यासाठी सरकारमधील भाजपा (BJP) आणि शिवसेना (Shivsena) हे पक्ष प्रयत्नशिल आहेत.

Mumbai APMC:
APMC election politics : एकनाथ शिंदे गटाला भाजपपेक्षा देविदास पिंगळे लाभदायक?

विशेषतः सहकार आणि बाजार समित्यांसारख्या आर्थिक सत्ता केंद्रावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकारातील वर्चस्वावर ताबा मिळविण्यासाठी भाजपा विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणुन मुंबई बाजार समित्यासारख्या आर्थिक सत्ता केंद्रावर तांत्रिक बांबींचा खुबीने वापर करत, वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न भाजपा शिवसेनेचा होता.

मात्र विविध सहकारी संस्थांची संचालक मंडळांची मुदत संपल्यानंतर किंवा भ्रष्टाचाराची कारणे देऊन, ती बरखास्त केल्यानंतर त्या ठिकाणी निवडणुका न घेता त्यावर राजकीय स्वार्थासाठी प्रशासकिय मंडळे नियुक्त करण्याच्या कार्यप्रणालीवर काही जनहिता याचिका दाखल झाल्या होत्या.

या जनहित याचिकांवर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने निर्णय देत, राजकीय प्रशासकिय मंडळे स्थापन करण्यात येऊ नयेत.असे आदेश दिले होते. या आदेशांनुसार पणन संचालकांनी परिपत्रक काढून राजकीय प्रशासकीय मंडळे स्थापन न करता शासकीय प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे मुंबई बाजार समिती वर राजकिय प्रशासक मंडळाचे सरकारचे आणि इच्छुक राजकीय नेत्यांचे स्वप्न भंगले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com