डोक्याला मार, डोळ्यांची हालचाल नाही...अशी होती हॉस्पिटलमध्ये आणल्यावर मेटेंची अवस्था

Vinayak Mete| शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे साडेसहाच्या सुमारास अपघाती निधन झालं.
Vinayak Mete
Vinayak Mete

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं आज पहाटे साडेसहाच्या सुमारास अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. ते 52 वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे 5.20 वा. अपघात झाला. त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Vinayak Mete medical report)

विनायक मेटे यांना रुग्णालयात आणल्यावर ते कोणत्या अवस्थेत होते याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक कुलदीप सलगोत्रा यांनी माहिती दिली आहे. ''विनायक मेटे यांना पहाटे ६ वाजून २० मिनिटांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. विनायक मेटे यांना रुग्णालयात आणल्यावर मी पहिल्यांदा त्यांना चेक केलं. त्यावरुन असं वाटतं की अपघाताच्या ठिकाणी त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा. त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागला, हृदयाचे ठोकेही नव्हते, रक्तदाब चेक केला, डोळे चेक केले, हृदयाचे ठोके पाहण्यासाठी ईसीजी केला, त्यातही फ्लॅट लाईन आली, अशा प्रकारे त्यांच्या कोणत्याही हालचाली नव्हत्या. त्यावेळीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

Vinayak Mete
Vinayak Mete : मराठा समाजाचा आवाज हरपला.. मेटेंच्या अपघाती निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा

विनायक मेटे यांच्या डोक्याच्या पाठीमागच्या भागाला गंभीर दुखापत झाली आहे. अशी दुखापत झाल्यास व्यक्तीचा जागीच मृत्यू होतो. पण आता त्यांना शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. त्यांच्यासोबत गाडीचा ड्रायव्हर आणि एक पोलिस शिपाईदेखील होता. पोलीस शिपायाच्या छातीला, किडनीला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृतीही चिंताजनक आहे. आमच्या डॉक्टरांची पूर्ण टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. तर ड्रायव्हर ठीकठाक आहे.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठी क्रांती मोर्चाने त्यांचा अपघात झाला की हा घातपात होता असा संशयही व्यक्त आहे. तसेच, त्यांच्या या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणीही मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रसायनी पोलिसांना मेटेंच्या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आठ जणांचे पथक नियुक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com