दसरा मेळाव्यानंतर छट पूजेच्या मैदानाचा वादही गेला हायकोर्टात; भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने

High Court : मुंबई महापालिका आयुक्त हे दबावाखाली काम करत आहेत...
Chhath Puja dispute Latest News
Chhath Puja dispute Latest NewsSarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्याच्या जागेवरून झालेले वाद काही महाराष्ट्रासाठी काही नवीन नाहीत. यंदा शिवसेनेच्या पारंपरागत असलेल्या दसरा मेळाव्याच्या मैदानाच्या जागेचा वाद हा चांगलाच गाजला. हा वाद हायकोर्टात गेला होता आणि तिथेच त्याचा निकाल लागला. हा वाद संपतो न संपतो तोच छट पूजेच्या मैदानाचा वादही आता हायकोर्टात गेला आहे. आता यावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॅाग्रेस आमनेसामने आले आहेत. (Chhath Puja dispute Latest News)

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील मैदानावर छट पूजेचे आयोजन राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका राखी जाधव करत असतात. त्यांना या परवानगीचे पत्रही मिळालं होतं. मात्र एकाच मैदानावर दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी परवानगी दिली गेली. यावरून राखी जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली होती यामुळे त्यांची परवानगी रद्द केल्याचा आरोप त्यांच्याकडून पालिका आयुक्तांवर केला जात आहे. यामुळे त्यांनी हायकोर्टाकडे दादा मागितली आहे.

राखी जाधव यांच्या म्हणण्यानुसार मुंबई महापालिका आयुक्त हे दबावाखाली काम करत असून त्यांनी भाजपच्या दबावामुळे त्यांना परवानगी दिली असल्याचा आरोप त्यांनी आयुक्तावर केला आहे. तर आपल्याला उच्च न्यायालयातून न्याय मिळेल,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळणार, असं चिन्ह दिसत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यांच्यासोबत गेलेले 40 आमदार आणि बारा खासदार व अन्य पदाधिकाऱ्यांच्या जोरावर त्यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा न्यायालयात केला आहे. यावरील निकाल अद्यापही सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. मात्र शिवसेनेच्या पारंपरागत असलेल्या दसरा मेळाव्याच्या मैदानाच्या जागेवरून मोठा वाद रंगला होता. अखेर या वादाचा तोडगा हायकोर्टात निघाला आणि कोर्टाने पालिका प्रशासनाला फटकारत शिवसेनेला शिवाजी पार्क येथील मैदान अर्थात शिवतीर्थ हे मैदान मिळालं होतं.

आता असाच वाद भाजप विरुद्ध राष्ट्रवादी छट पूजेच्या मैदानावरून रंगला आहे. आता या प्रकरणी काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in