
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे गेल्या काही दिवसांपासून मशीदींवरील भोंग्यावरून चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. त्यांच्या या भूमिकेला भारतीय जनता पक्षाकडून (BJP) खुलेआम समर्थन मिळत आहे. त्यामुळे त्यांची भाजपशी चांगलीच जवळीकता वाढलेली बघायला मिळत आहे. तर राज ठाकरेही भाजपवर टीका करण्याचे टाळत असून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार हल्लाबोल करतांना दिसतात. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीच्या चर्चाही रंगत आहेत यातच राज ठाकरेंची गाडी ही भाजप कार्यालयासमोर दिसल्याने चर्चांना चांगलचं उधाण आल. मात्र, राज यांची गाडी भाजप कार्यालयासमोर का उभी होती. याचे कारणही समोर आले आहे.
राज ठाकरेंची गाडी आज (ता. 2 मे) भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयाबाहेर उभी दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि चर्चेला सुरूवात झाली. राज यांच्या एम. एच 46 जे 9 हा गाडीचा नंबर आहे. 9 नंबर हा राज ठाकरे यांचा लकी नंबर आहे. शिवाय या गाडीतून राज यांनी अनेकदा प्रवास केलेला आहे. त्यामुळे राज यांची गाडी भाजप कार्यलय समोर कशी?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र याबाबतची माहिती समोर आली आल्याने चर्चा थांबल्या.
झाल असं की, राज ठाकरे यांची ही गाडी एस.के मोटर्सचे मालक सतीश कोठावळे यांनी 14 डिसेंबरला राज ठाकरे यांच्याकडून विकत घेतली आहे. कोठावळे हे त्यांचे सहकारी सहदेव पाटील यांना घेऊन भाजप प्रदेश कार्यालयात आले होते. यामुळे भाजप कार्यलयाजवळ ही गाडी दिसताच राज ठाकरे भाजप कार्यालयात आले की काय अशी चर्चा रंगायला सुरूवाच झाली होती. मात्र, काही वेळीने याबाबत कोठावळेंनी माहिती दिली आणि होत असलेली चर्चा थांबली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.