20 जुलैला होणार शिंदे सरकारचा फैसला

Eknath Shinde| शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत बुधवारी (20 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे
Eknath Shinde, Supreme Court
Eknath Shinde, Supreme Courtsarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत बुधवारी (20 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. बंडखोर आमदारांवरील अपात्रतेवरील याचिका, शिंदे-फडणवीस सरकारची वैधता, विधिमंडळात शिवसेनेचा खरा दावेदार कोण, या गोष्टींवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील (Supreme court) सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला असल्याची चर्चा आहे.

राज्यपालांनी शिंदे सरकारला बहुमत चाचणीची परवानगी देणे, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिंदे गटातील १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई या सर्व बाबींवर शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात चार याचिकांद्वारे आव्हान दिले आहे. शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी या याचिका दाखल केल्या आहेत.

Eknath Shinde, Supreme Court
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींनी साधला माध्यमांशी संवाद

शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली होती. सुरुवातीला 16 आमदार आमदारांवर कारवाई करण्याची मागणी पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी केली होती. तर त्यानंतर बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करत शिवसेनेनेचा व्हीप न पाळल्यामुळे सर्व 39 आमदारांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातही शिवसेनेने याविरोधात याचिका दाखल केली आहे. तर दूसरीकडे बंडखोर आमदारांकडूनही याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकांवर होणार सुनावणी

पक्षांतरबंदी कायद्यानुसार विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्यासाठी कार्यवाही सुरू केली. या कारवाईविरोधात एकनाथ शिंदेंसह इतर 16 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर जोपर्यंत उपाध्यक्ष झिरवळ यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमदारांवरील कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. आता यावर 20 जुलैला सुनावणी होणार आहे.

त्यानंतर अपात्रतेवरील सुनावणी प्रलंबित असताना राज्यपालांनी शिंदे गट आणि भाजपला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले. या निर्णयाला शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले होते. 29 जूनला सर्वोच्च न्यायालयाने मागणी फेटाळल्यावर 20 जुलैला यावर सुनावणी होणार आहे.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपचे बंडखोर आमदारांनी उल्लंघन केले, यानंतर प्रभू यांनी व्हीप न पाळणाऱ्या आमदारांवर कारवाईची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in