Sanjay Raut on ED Arrest : 'ईडी'ने अटक करायच्या आदल्या दिवशी...; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut News| गेल्या वर्षी ३१ जुलै २०२२ रोजी संजय राऊतांना ईडीने अटक केली होती.
Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama

Sanjay Raut on ED Arrest : ज्या दिवशी 'ईडी'ने (ED) मला अटक केली, त्याच्या आदल्या दिवशी एका नेत्याचा मला फोन आला होता. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलू, असं त्यांनी मला सांगितलं. पण मी त्याला नकार दिला. पण मी काहीही झालं तरी ईडीच्या समोर झुकायचे नाही असं आमच्या घरी ठरलं होतं.शिवसेनेच्या प्रतिमेला धक्का लागेल, असे कोणतही कृत्य करायचं नाही. असा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (The day before the ED arrested...; Sanjay Raut's secret blast)

Sanjay Raut
NCP New Chief : मोठी बातमी : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला ; कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न ; अध्यक्षपदी..

गेल्या वर्षी ३१ जुलै २०२२ रोजी संजय राऊतांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या या अटकेच्या घटनेबाबत संजय राऊत यांनी मोठे खुलासे केले आहेत. जेव्हा मला ईडीने अटक केली, मला आर्थर रोड जेलमध्ये नेणअयात आलं, त्यावेळी आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांना हुंदका फुटला होता. पण मला विश्वास होता की मी लवकरच बाहेर येईल. ईडीने केलेल्या अटकेनंतर तीन महिन्यात बाहेर आलेला मी एकमेव माणूस असल्याचं यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं. (Sanjay Raut on Arrest)

ते म्हणाले की, गेल्या आठ ते नऊ वर्षात राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. महाराष्ट्रातील संवाद संपला आहे.सध्या व्यक्तिगत हल्ले होऊ लागले आहेत. मी राजकीय भूमिका मांडतो.पण मी व्यक्तिगत हल्ले कधीही करत नाही.दबावाला बळी पडून अनेकांनी शिवसेना सोडूली. पण मी दबावाला बळी पडलो नाही. आमच्या रक्तात शिवसेना आहे. सगळे गेले तरी आम्ही शेवटपर्यंत पक्षात राहू पण शिवसेना सोडणार नाही. शिवसेना ही महाराष्ट्राची आणि आमची भावनिक गरज आहे. (Sanjay Raut on ED )

Sanjay Raut
MNS News: ''उध्दवचं मुख्यमंत्रीपद जावं असं कधीच वाटलं नाही..''; राज ठाकरेंच्या मातोश्री असं का म्हणाल्या?

तसेच, पक्ष सोडून गेलेले परत येणार असतील तर त्यांना मी विरोध करेल असे राऊतांनी यावेळी सांगितलं. जे पक्ष सोडून गेले त्यांना नेत्यांना सगळे काही मिळलं होतं. तरीही त्यांनी पक्ष सोडला. त्यांच्याा पक्ष सोडण्याला आमचा विरोध नाही. पण शिवसेना ही आमचीच म्हणणं चुकीचं आहे, असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com