Mumbai High Court
Mumbai High CourtSarkarnama

दोन गटांची भांडणे : त्यांच्यात `सेटलमेंट` होताच न्यायालयाने सुनावली अनोखी शिक्षा

सहा महिने वर्सोवाचा (Versova) समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची शिक्षा न्यायालयाने दिली

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) १२ वर्षांपूर्वींचे दोन स्वतंत्र एफआयआर रद्दबातल करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्या आठ जणांना अनोखी शिक्षा सुनावली आहे. वर्सोवाचा (Versova) समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची शिक्षा न्यायालयाने दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते अफरोज शहा यांच्या वर्सोवा सागरीकिनारा स्वच्छता अभियानात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी पुढील सहा महिने सहभागी व्हावे, असे आदेश खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयाने दिलेली ही शिक्षा चर्चेचा विषय ठरली आहे.

एप्रिल २०१० मध्ये तरुण मुलांच्या दोन गटांनी फौजदारी तक्रारी दाखल केल्या होत्या. यापैकी एका तक्रारीत एका मुलीला शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिचे आक्षेपार्ह फोटो काढले, तिच्याकडून लाखो रुपये आणि सोन्याची चेन घेतली, तसेच या मुलांनी तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर दुसऱ्या तक्रारीत मुलीच्या निकटवर्तीयांनी एका मुलाकडून पैसे उकळल्याचा आरोप चारकोप पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत केला होता.

Mumbai High Court
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

पहिल्या तक्रारीत अंबोली पोलिसांनी (Police) न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. मात्र, यादरम्यान दोन्ही संबंधित पक्षकारांनी एकमेकांशी समेट घडवून आणला. त्यामुळे या दोन्ही तक्रारी रद्दबातल कराव्यात, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली. यामध्ये तक्रारदार मुलीचे आणि मुलाचे प्रतिज्ञापत्रदेखील दाखल करण्यात आले. न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली.

Mumbai High Court
रश्मी शुक्ला यांचे पोलिसांवर गंभीर आरोप; न्यायालयात धाव

दोन्ही पक्षकारांनी आपापसात समेट केला आहे. या तक्रारीत दोन्ही पक्षकारांनी स्वतःकडील पैसे एकमेकांना दिले. मात्र, आता सहमतीने तडजोड झाली आहे. त्यामुळे आता या फौजदारी तक्रारी कायम ठेवण्यात तथ्य नाही. सर्व आरोपींना आता न्यायालयात हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत खंडपीठाने दोन्ही एफआयआर रद्दबातल केले. तसेच न्यायालयाने दोन्ही तक्रारीतील आठ आरोपींना वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची अनोखी शिक्षा सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com