राणा दांपत्यामुळे इतर रहिवाशीही आले अडचणीत!

न्यायालयाने राणा दांपत्याला एक महिन्याचा अवधी दिल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
राणा दांपत्यामुळे इतर रहिवाशीही आले अडचणीत!
Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या खार येथील निवासस्थानातील अनधिकृत बांधकामावर पालिकेने (Mumbai Municipal Corporation) कारवाईचा इशारा दिला होता. पालिकेने त्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती, जी शुक्रवारी संपत आहे. या कारणाने आता राणा दांपत्याने न्यायालयात (Court) धाव घेतली आहे. हे बांधकाम अधिकृत करावे, अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली. त्यामुळे या प्रक्रियेसाठी न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा अवधी दिला असून पालिकेच्या कारवाईला तूर्तास ब्रेक लागला आहे. (Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News)

Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News
चंद्रकांतदादा अडचणीत! रुपाली चाकणकर 'अॅक्शन मोड'वर

मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात राणा दांपत्याला निवासस्थानातील अनधिकृत बांधकाम हटवण्याची अन्यथा पालिकेच्या कारवाईला सामोरे जाण्याचा नोटीस बजावली होती. या नोटिशीला आता आठवडा झाल्याने राणा दांपत्याने त्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. तसेच घरातील बांधकाम अधिकृत करण्यासाठी न्यायालयाकडे मागणीही केली. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा अवधी दिल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

मात्र, या कालावधीनंतर बांधकाम अधिकृत करण्यासाठी न्यायालयाने कोणतेही ठोस आदेश न दिल्यास आम्ही कारवाई करू, अशी माहिती एच वेस्ट विभागाचे सहायक आयुक्त विसपुते यांनी दिली आहे. मंजूर आराखड्याच्या तुलनेत अनधिकृत बदलांसाठी पालिकेने राणा यांना ही नोटीस बजावली.

Navneet Rana and Ravi Rana Latest Marathi News
लडाखमध्ये २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत कोसळले; ७ जवान ठार, इतरांची प्रकृती गंभीर

त्यामध्ये लिफ्ट फ्लॅटमध्ये समाविष्ट करणे, पूजाघर स्वयंपाकघरात समाविष्ट करणे तसेच लॉबीचा भाग राहण्यासाठी वापरणे व दोन बेडरूम एकत्रित करणे, यांसारखे अनधिकृत बदल पालिकेच्या पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना आढळले आहेत. याच आराखड्याशिवायच्या बदलांसाठी पालिकेने आक्षेप घेत नोटीस बजावली होती. राणा दांपत्यासोबत आता पालिकेने इमारतीतील प्रत्येक माळ्यावरील रहिवाशांना नोटीस बजावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in