Sambhaji Raje Chhatrapati|
Sambhaji Raje Chhatrapati|

आम्हाला बोलू देत नाहीत; मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा संभाजीराजेवर गंभीर आरोप

Maratha Reservation | Sambhaji Raje Chhatrapati| संभाजीराजे आणि मराठी क्रांती मोर्चा समन्वयकांमध्ये फुट पडल्याचे चित्र समोर येत आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर गुरुवारी (ता. २६ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. पण या बैठकीवरुन आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकांवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत आयोजित मराठा आरक्षाणासंबंधीच्या बैठकीत संभाजीराजेंनी कुणी काही बोलले तर बैठकीतून आपण निघून जाऊ, अशी धमकी दिल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनी केली आहे.

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. असे असतानाच मराठा आरक्षणप्रश्नी मराठा क्रांती मोर्चा आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्यातील मतभेत समोर आले आहेत. गेल्या काही वर्षांत मराठा क्रांती मोर्चाने समाजाच्या मांगण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढले. या मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा देत मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यात आल्या. मागण्या मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू असतानाच आता संभाजीराजे आणि मराठी क्रांती मोर्चा समन्वयकांमध्ये फुट पडल्याचे चित्र समोर येत आहे.

Sambhaji Raje Chhatrapati|
शिंदेसाहेब, तुम्ही गुवाहाटीला गेला, त्यावेळी मी पहिले समर्थन केले; आता आमचा आवाज का दाबता?

मराठी क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनी (coordinator) छत्रपती संभाजीराजेंवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत आयोजित बैठकीत संभाजीराजेंनी समन्वयकांना दमदाटी केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या या बैठकीनंतर छत्रपती संभाजीराजेंविरोधात मराठा आक्रमक झाला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून दमदाटी झालेल्या दमदाटीच्या आरोपांमुळे आता हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे. तसेच आता मराठा क्रांती मोर्चा काय भूमिका घेणार याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

दूसरीकडे, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांचे माजी स्वीय सहायक योगेश केदार यांनी आम्हाला बोलू दिले नाही म्हणत बैठकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत केले आहे. तसेच, आरक्षणावर न बोलणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संभाजीराजे आणि इतर नेतेमंडळींचा समाचार घेतला आहे. केदारी यांनी एक फेसबुक पोस्ट लिहित कालच्या मराठा समाजाच्या बैठकीचा समाचार घेतला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कालची बैठक काही मराठा नेत्यांनी स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी बोलावली होती का? याचा दाट संशय येतोय. आरक्षण सोडून इतर चिल्लर गोष्टींवर चर्चा कोणत्या सरकारला आवडत नाही? अनेकांचा आवाज दाबला जात होता.

अशी बैठक यापूर्वी कधीच बोलावली गेली नाही, त्यामुळे सरकारचे आभार माना हे संभाजीराजे वारंवार का बोलत होते? हेच कळले नाही. अरे सरकारचे परम कर्तव्य आहे की, मराठा समाजाला बोलावून त्यांची भूमिका ऐकण्याचे. सरकारने काल बैठक बोलावली म्हणजे काही उपकार केले नाहीत मराठा समाजावर. काही विकाऊ अभ्यासक आणि याचिकाकर्त्यांची नावं जाणीवपूर्वक पुढे करत होते. दुसरे अभ्यासक नाहीत का समाजात? या बाबी समाज म्हणून आम्हाला पटलेच नाही. महाराजांनी प्रामाणिक लोकांना महत्त्व द्यावे, चाटूगिरांना नाही. समाजात खूप दिग्गज लोक आहेत, पण ते समोर येऊ शकले नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com