दसरा मेळाव्याचा वाद संपता संपेना; आता दुर्गाडी उत्सवाचा वाद पेटला !

Eknath Shinde : शिंदे गट अन् शिवसेनेमध्ये जुंपली!
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest NewsSarkarnama

डोंबिवली : 'शिवतीर्था'वर दसरा मेळावा कोणाचा यावरुन राज्यात शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु असतानाच कल्याणमध्ये किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सव यावरूनही शिंदे, ठाकरे गट भिडले आहेत. उत्सव आम्हीच साजरा करणार,असा दावा दोन्ही गटाने केला आहे. जिल्हा प्रशासनाकडे हा प्रस्ताव गेला असून आता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News)

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
शिवसेनेला रोज संजय राऊत यांची आठवण... तोडीस तोड उत्तर देणाऱ्या नेत्याची वाणवा

कल्याण येथील किल्ले दुर्गाडीवर 1968 साली पूजा अर्चा करण्यासाठी बंदी हूकूम जारी करण्यात आला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक बंदी हूकूम मोडून देवीची पूजा बांधली होती. तेव्हापासून आतापर्यंत 54 वर्षापासून दरवर्षी शिवसेनेकडून दुर्गाडीवर दुर्गाडी देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शिवसेनेचा शहर प्रमुख असतो. यंदा राज्यात शिवसेनेत दुफळी निर्माण झाली असून शिंदे व ठाकरे गटात सेना विभागली गेली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
शिंदे गटापाठोपाठ शिवसेनेच्याही टार्गेटवर मंत्री रविंद्र चव्हाण...

दसरा मेळाव्यावरुन राज्यात शिंदे व ठाकरे गटात वाद सुरु आहे. तर दुसरीकडे कल्याणमध्ये दुर्गाडी देवीचा उत्सव साजरा करण्यावरुन शिंदे ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी याविषयी सांगितले, यासंबंधी पोलिस प्रशासनासह जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती आम्हाला पोलिसांनी दिली आहे. परवानगी मिळताच दुर्गाडी येथे उत्सव साजरा केला जाईल, असे बासरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. आम्हाला परवानगी मिळणार आणि आम्हीच दुर्गाडीवर उत्सव साजरा करणार, असा दावा भोईरांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde Latest News
राज ठाकरेंच्या हॉटेलबाहेर महिला आक्रमक; मनसे पदाधकाऱ्यांविरोधात निदर्शने

यामुळे नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या परवानगीवरुन शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आलेले आहेत. आत्ता जिल्हाधिकाऱ्यांकडून नवरात्र उत्सवाची परवानगी कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिंदे गटाला समर्थन देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी नवरात्र उत्सवानिमित्त किल्ले दुर्गाडी परिसरात स्वच्छचा करण्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com