शिवसेनाप्रमुखांच्या विधानसभेतील तैलचित्रासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला असा पुढाकार !

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeraysarkarnama

पुणे : राज्याच्या विधानसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यात हे तैलचित्र तयार करून विधिमंडळाच्या मुख्य सभागृहामध्ये अनावरण करण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी गुरूवारी विधानसभेत केली.

Balasaheb Thackeray
नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या मुख्य सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र अध्यक्ष नार्वेकर यांनी दिले होते. ही मागणी मान्य करीत अध्यक्ष नार्वेकर यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी तैलचित्र लावण्याची घोषणा केली.

Balasaheb Thackeray
पिंपरी प्राधिकरणाच्या विलीनीकरणातून मिळालेले भूखंड `PMRDA`ने काढले विकायला...

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापूर्वी गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. या काळात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानसभेच्या मुख्य सभागृहात लावणे अपेक्षित होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हे काम होऊ शकले नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न या तातडीच्या निर्णयामागे दिसत आहे.

Balasaheb Thackeray
BJP : शिवबंधन तोडत धैयशील कदमांनी हाती घेतले कमळ...

आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे खरे विचार आम्हीच पुढे घेऊन जात आहोत, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी करणे आणि त्यास अध्यक्ष नार्वेकर यांनी तातडीने मान्यता देणे यास राजकीय महत्त्व आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खरी शिवसेना कुणाची यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. शिवसेनेवर हक्क सांगण्यासाठी दोन्ही बाजू निवडणूक आयोगाकडे गेल्या आहेत. यावर सुनावणी अद्याप बाकी आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार आणि वारसा आम्हीच पुढे नेत आहोत, हे सातत्याने ठसविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून होताना दिसत आहेत. तैलचित्र बसविण्याची मागणी करण्याची भूमिका ही त्या प्रयत्नांचाच भाग असल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in