भाजपच्या ताकदीवर मुख्यमंत्री लोकशाहीला न शोभणारे वक्तव्ये करतायेत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

मुंबई - देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी 21 जुलैला मतदान होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 200 आमदारांची मते एनडीएला उमेदवाराला मिळतील असा दावा केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले ( Nana Patole ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ( The Chief Minister is making undemocratic statements about BJP's strength )

Nana Patole
थोडे दिवस जाऊ द्यात...मुख्यमंत्र्यांचे डोक ठिकाणावर येईल...नाना पटोले

नाना पटोले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ज्या गर्वाने वक्तव्य करत आहेत. आम्ही याला तोडू, त्याला तोडी ही जी भाषा गर्वाची भाषा पहिल्यांदा महाराष्ट्रात ऐकायला मिळत आहे. गर्वाने व सत्तेच्या दबावाने दुसऱ्या पक्षाचे आमदार तोडणे ही लोकशाही संपविण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

Nana Patole
नाना.. आता तुम्ही शांत बसा, आम्ही देऊ ओबीसी आरक्षण !

ते पुढे म्हणाले की, लोकशाही संपविण्याचा प्रयत्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावा ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनिय भाषा आहे. अशी भाषा मुख्यमंत्री अशी भाषा वापरणे अयोग्य आहे. ही वक्तव्ये ते भाजपच्या ताकदीवर करत आहेत.

ते गर्वाने अशोभनिय वक्तव्य करत आहेत. मात्र 21 तारखेला राष्ट्रपतीपदाचे मतदान आहे. त्यावेळी कळेल कोण कोणाबरोबर आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com