वर्षा बंगल्यावर खलबतं; मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

Rajysabha Elelction Latest news | Mahavikas Aghadi| राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे.
वर्षा बंगल्यावर खलबतं; मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक
Rajysabha Elelction Latest news, CM Uddhav Thackeray News in Marathi

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. राज्यसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज संध्याकाळी वर्षा बंगल्यावर अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. राज्यसभा निवडणुकीची (Rajyasabha Election) रणनीती आखण्यासाठी ही बैठक होणार आहे. (Rajysabha Elelction 2022 Latest news)

भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पाठिंबा देण्याविषयी अपक्ष आमदारांना गळ घालतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Rajysabha Elelction Latest news, CM Uddhav Thackeray News in Marathi
MNS : वसंत मोरेंची बैठकीला दांडी ; मोरे अन् पदाधिकाऱ्यांतील संघर्ष तीव्र

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना आणि शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. (CM Uddhav Thackeray News in Marathi)

महाविकास आघाडीकडे मिळून २६ अतिरिक्त मतं आहेत. तर जिंकण्यासाठी आघाडीला १६ मतांसाठी अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपाकडे स्वत:ची २२ अतिरिक्त मतं आहेत, तर इतर ७ आमदारांचा पाठिंबा पाहता एकूण २९ मते भाजपकडे आहेत. भाजपला जिंकण्यासाठी १३ मतांची गरज आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर भाजपचा डोळा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in