भोंग्याकडे लक्षवेधून केंद्र सरकार जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतेय

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीका केली.
 Mahesh Tapase| NCP
Mahesh Tapase| NCPSarkarnama

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांवरून राज्याचे राजकारण तापविले आहे. दिल्लीत भाजपनेही भोंग्याचा विषय ऐरणीवर घेतली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपवर टीका केली. ( The central government is trying to shirk responsibility by focusing on loudspeakers )

महेश तपासे म्हणाले की, भोंग्यांसारख्या निरुपयोगी विषयांकडे जनतेचे लक्ष वेधून अर्थव्यवस्थेतील महत्वपूर्ण प्रश्नातून केंद्र सरकार जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा अनेक अनावश्यक गोष्टींना महत्त्व मिळत राहिल्यास अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे शक्य होणार नाही, अशी भीती महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

 Mahesh Tapase| NCP
बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीचे मतांत परिवर्तन होणार नाही...

ते पुढे म्हणाले की, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने देशातील बेरोजगारीचा दर वाढत असल्याच्या बातम्या पाहायला मिळत आहेत. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला येऊन महागाईने उच्चांक गाठला आहे. सध्या बेरोजगारीचा दर 7.83 टक्क्यावर पोचला आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला.

 Mahesh Tapase| NCP
चालीसा म्हणायला तुमचं घर कमी पडतंय का... अजित पवार

मागील दोन वर्षांतील कोरोनाचे संकट आणि दिवसेंदिवस देशातंर्गत वाढत असलेल्या महागाईमुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास विलंब होत असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होत नाहीत. अलीकडेच, देशाची अर्थव्यवस्था सावरायला 12 वर्षे लागतील अशी चिंता आरबीआयने आपल्या अहवालात व्यक्त केली असल्याचे तपासे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com