निर्बंधांबाबत केंद्राने 'एसओपी' जाहीर करावी; अडीच टक्के रूग्णांवरच हॉस्पिटलमध्ये उपचार...

राज्यातील State १५ ते १८ वयोगटातील सरसरी ४० टक्क्यांपर्यंत 40 percent लसीकरण Vaccination पूर्ण झालेले आहे. अशीच गती राहिल्यास येत्या आठ दहा दिवसांत सर्व लसीकरण पूर्ण व्हायला हवे.
Dr. Rajesh Tope
Dr. Rajesh Topesarkarnama

मुंबई : कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असली तरी केवळ अडीच टक्केच लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून ८६ टक्के बाधित लोक गृहविलगीकरणात आहेत. त्यामुळे नागरीकांनी शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे गरजेचे आहे, जेणे करून रूग्णसंख्या अधिक वाढणार नाही. पण, निर्बंधाबाबत केंद्र सरकारने अभ्यास करून 'एसओपी' तयार करून त्या द्याव्यात, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी डॉ. टोपे म्हणाले, प्रधानमंत्री लॉकडाउन बाबत काहीही बोलले नाहीत. पण, निर्बंधाबाबत काहीतरी 'एसओपी' असायला हव्या. त्यासाठी केंद्र सरकारने अभ्यास करून सर्व राज्यांसाठी एकच एसओपी द्याव्यात. राज्यात रूग्ण संख्या वाढत आहे. पण, ८६ टक्के लोक गृहविलगीकरणात आहेत. ४० टक्के लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Dr. Rajesh Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला दिलासा;पाहा व्हिडिओ

हॉस्पिटलमध्ये दाखल रूग्णांपैकी २.५ टक्के लोक आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे केवळ दोन ते अडीच टक्के लोकांवरच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही ताण नाही. पण, रूग्ण संख्या वाढत असताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरीकांनी निर्बंध पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. टोपे यांनी व्यक्त केली.

Dr. Rajesh Tope
महाबळेश्वरातील निर्बंध हटवण्यासाठी पालकमंत्री, आमदारांची सचिवांकडे धाव

पहिल्या डोसबाबत ९८ लाख लोक वंचित आहेत, त्याच्या लसीकरण कसे पूर्ण करणार, या प्रश्नावर डॉ. राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाचे लोक 'घरघर दस्तक' च्या माध्यमातून तसेच इतर विविध योजनाच्या माध्यमातून लसीकरणावर भर देणार आहेत. मिशन कवच कुंडलच्या माध्यमातून आरोग्य विभागाचे कर्मचारी आता घराघरात जाणार असून आशा वर्कर्सनी घराघरात जाऊन कोण कोण लसीपासून वंचित राहिलेत त्याचा शोध घेतला जाणार आहे.

Dr. Rajesh Tope
मार्चपर्यंत इंपेरिकल डेटा मिळण्यासाठी आग्रही : अजित पवार

लसीकरण ऐच्छिक ठेवल्यामुळे कायदेशीर अडचणी येत आहेत. पण, शंभर टक्के लसीकरण करायचे आहे. त्यासाठी केंद्राने मार्गदर्शन करावे, याबाबत आम्ही कालच्या बैठकीत तशी लेखी मागणी केली आहे. आता केंद्राच्या आदेशाची आम्हाला प्रतिक्षा आहे. लसीचे साडे सहा लाख डोस आमच्या हातात मिळाले आहेत. त्याचे वाटप सुरू आहे. ४० लाख को व्हॅक्सिन हव्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात लसीचा स्टॉक राहिल, अशा दृष्टीने लसींचे वाटप होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Dr. Rajesh Tope
महेश लांडगेंचे कोल्हे-आढळरावांना आवाहन; उद्धव ठाकरे अन् अजितदादांकडे पाठपुरावा करा!

राज्यातील १५ ते १८ वयोगटातील सरसरी ४० टक्क्यांपर्यंत लसीकरण पूर्ण झालेले आहे. अशीच गती राहिल्यास येत्या आठ दहा दिवसांत सर्व लसीकरण पूर्ण व्हायला हवे. पण ते काळजी घेऊन केले तरी सध्या कॉलेजला सुट्ट्या दिल्या आहे. पण, शाळा कॉलेजमध्ये दक्षता घेऊन लसीकरण केले असते तर त्यामध्ये दिलासा मिळाला असता. ६० लाख युवकांना लसीकरण करायचे आहे, त्यापैकी ४० टक्के काम पूर्ण झालेले आहे. सुट्ट्या दिल्याने अडचण येत असून युवकांना घरातून आणून लसीकरण करायचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com