ठाकरेंचे विश्वासू संजय पांडे अडकले; ईडी, सीबीआयनं फास आवळला

Sanjay Pandey latest news| संजय पांडे हे गेल्याच आठवड्यात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते.
Sanjay Pandey latest news|
Sanjay Pandey latest news|

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संंजय पांडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयने तीन आणि ईडीने दोन एफआयआर नोंदविल्या आहेत. (Sanjay Pandey latest news update)

२००९ ते २०१७ या कालावधीत एनएसईच्या कर्मचाऱ्यांच्या फोनचे बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण, संजय पांडे या दोघांविरोधा बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात कारवाई सुरू आहे. एनएसईचे माजी एमडी रवी नारायण यांच्या विरोधातही ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सीबीआयने देशभरात संजय पांडे यांच्याशी संबंधित १६ ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. मुंबईत आठ, पुण्यात दोन, चंदीगड, लखनऊ आणि कोटा येथे प्रत्येकी एक आणि दिल्ली एनसीआरमध्ये पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

Sanjay Pandey latest news|
कल्याण डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार; तब्बल ५५ नगरसेवक शिंदे गटात सामील

याप्रकरणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय पांडे यांच्यावर जे छापे टाकण्यात आलेले आहेत तो केंद्रीय यंत्रणेच्या तपासाचा भाग आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही, असं त्यांनी म्हटलंं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) को-लोकेशन घोटाळाप्रकरणी मंगळवारी (५ जुलै) ने चौकशी केली. संजय पांडे हे गेल्याच आठवड्यात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते.

संजय पांडे यांनी 2001 मध्ये पोलीस खात्यातील सेवेचा राजीनामा दिला आणि आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली. मात्र त्यावेळी तांत्रिक कारणामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

2006 मध्ये संजय पांडेंनी त्यांच्या आई व मुलाला आपल्या कंपनीत संचालकपद दिले. संजय पांडे यांच्या या कंपनीकडे एनएसईचे सव्‍‌र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षणाचे कंत्राट देण्यात आले होते. 2010 ते 2015 या कालावधीत लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या आयसेक सर्व्हिसेसच्या लेखापरीक्षण अहवालात एनएसईमधील गैरव्यवहार का उघड झाला नाही, याबाबत ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. एनएसई गैरव्यवहार प्रकरणात २०१८ मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी तपास करत आहे. संजय पांडे यांनी पांडे यांनी समाविष्ट केलेली फर्म 2010 ते 2015 या कालावधीत एनएसईमध्ये सिक्युरिटी ऑडिट करण्याचे काम सोपवलेल्या आयटी कंपन्यांपैकी एक होती, यालाच को-लोकेशन घोटाळा झाल्याचे मानले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com