शालेय मुलांच्या पाठीवरच ओझं असं होणार कमी: शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Home Work | Students| शाळेतच नोट्स काढून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे
Home Work | Students|
Home Work | Students|

मुंबई : महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी (Students) शिंदे सरकारने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शिंदे सरकार आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा गृहपाठ (Home Work) बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

शाळेतच नोट्स (Notes) काढून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जाणार आहे. यासोबतच वह्या पुस्तके वेगवेगळी करण्यापेक्षा पुस्तकामध्ये वह्यांची पानं जोडली जाणार असून त्यावरच नोट्स काढल्या जातील. त्यामुळे घरी येऊन पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू आहे. पण आता यावर शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया काय येतात हे हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in