India Alliance PC : 'सबको लाथ अन् मित्रोका विकास' ही भाजपनीती चालू देणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले !

Uddhav Thackeray On Modi Government : "पाच साल लूट आणि निवडणुकीच्या वेळी सूट .."
India Alliance PC
India Alliance PC Sarkarnama

Mumbai News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या मंथनासाठी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडिया 'आघाडी'च्या घटक पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत २८ पक्षांचे ६३ व्हीआयपी नेते सहभागी झाले आहेत. आघाडीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आज इंडिया आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. (Latest Marathi News)

India Alliance PC
INDIA Coordinator Committee : इंडिया आघाडीची समन्वयक समिती स्थापन; महाराष्ट्रातील 'या' नेत्यांचा समावेश

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपली इंडिया आघाडी मजबूतीने पुढे जात आहे. आपली ही एकजूट पाहून आपले विरोधी भाजपमध्ये भीतीचे वातावरण आहे. भाजपविरोधातली ही एकजूट आहे. आजच्या बैठकीत बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. काही गोष्टींसाठी रणनीती ठरली आहे. आपली लढाई ही हुकमशाहीच्या विरोधात आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे."

India Alliance PC
INDIA Alliance Meeting : पटना, बंगळुरू, मुंबईनंतर 'इंडिया'ची चौथी बैठक 'या' शहरात ? मुख्यमंत्र्यांनी घातली गळ !

"संपूर्ण भारत देश हा माझा परिवार आहे. भाजपकडून नेहमी परिवारदावर बोललं जातं. पण 'सबको लाथ आणि मित्रोका विकास' ही भाजपची नीती आता चालू देणार नाही. आज जनतेच्या मनात भिती आहे. मात्र आपल्याला भयमुक्त भारत निर्माण करायचं आहे. यांच्या सत्ताकाळात अत्याचारात वाढ झाली. महागाई वाढली आहे, 'पाच साल लूट आणि निवडणुकीच्या वेळी सूट' हे आता चालू देणार नाही. ही लढाई आपल्या सर्वांची आहे, या विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in