त्या वादग्रस्त फोटोबाबत भाजप नगरसेवकाची तक्रार

राष्ट्रीय काँग्रेसचे युवा अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनी हा एडिट केलेला फोटो ट्विट केला आहे.
त्या वादग्रस्त फोटोबाबत भाजप नगरसेवकाची तक्रार
Tipu Sultan- Shivaji Maharaj Edited PhotoSarkarnama

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) फोटो एडिट करून टिपू सुलतानचा (Tipu Sultan) फोटो ट्विट करणाऱ्या ट्विटर युजर विरोधात भाजपचे नगरसेवक कमलेश यादव (Kamlesh Yadav) यांनी कांदिवली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे युवा अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास (Srinivas BV) यांनी हा एडिट केलेला फोटो ट्विट केला आहे. त्यामुळे आता श्रीनिवास यांच्याविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे. यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

बी.व्ही.श्रीनिवास यांनी टिपू सुलतानच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ फोटोवर टिपू सुलतानचा फोटो टाकून ट्विट केले आहे. हे आम्ही किंवा कोणताही भारतीय व्यक्ती हे सहन करु शकत नाही. श्रीनिवास यांच्या या अपमानास्पद पोस्टमुळे आम्ही दुखावले गेलो असल्याचे यादव यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेआहे. यामुळे श्रीनिवास यांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी करत यादव यांनी लेखी तक्रार कांदिवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Tipu Sultan- Shivaji Maharaj Edited Photo
दिल्लीतून फोन येताच अमल महाडिकांची माघार अन् सतेज पाटील बिनविरोध

महाराष्ट्रातील मराठयांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायचित्राशी छेडछाड करून त्यांच्या चेह - यावर हिंदूविरोधी मुस्लिम शासक टीपू सुलतानचा चेहरा एडीट करुन श्रीनिवास यांनी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. याचबरोबर श्रीनिवास यांचे हे कृत्य हिंदूविरोधी व महाराष्ट्रातील तमाम हिंदू मराठ्यांच्या भावना दुखावणारे आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या वतीने कॉंग्रेसचा निशेध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहले शासक असून त्यांच्या कार्याचा जगभरातून गौरव केला जातो. त्यांच्या युध्दकलेचा आणि युध्द्धनितीचा अभ्यास जगभरातील बलाढ्य देशांमधून केला जात असताना श्रीनिवास वी वी यांच्या कृत्यातून त्यांच्या पक्षाची हिंदूव्देषी वृत्ती दिसून येत आहे. छात्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता असून महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करणा - या भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षाला अवध्या महाराष्ट्रासह भारतीय जनता पक्ष कधीही माफ करणार नाही, असेही यादव यांनी म्हटले आहे. याचवेळी यादव यांनी श्रीनिवास यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in