उद्या कडक ऊन पडले म्हणून भाजप जबाबदार...!

नवनीत राणा Navneet Rana व रवी राणा MLA Ravi Rana यांच्या घराबाहेर शिवसैनिक Shivsena supporter जमा झाले असून त्यांनी बॅरेकेट तोडले आहेत. हे सर्वसामान्य माणसाला न पटणारे असून याचा भारतीय जनता पार्टी BJP तीव्र शब्दात निषेध करते.
Chandrakant Patil
Chandrakant Patilsarkarnama

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरामीटर बदलत चालले आहेत. सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कायदा सुव्यवस्था हातात घेणे आंदोलन करणे हा त्याचाच भाग आहे. मोहित कंबोज पोलखोल यात्रा रथावर दगडफेक असेल, आजचा ड्रामा चालला आहे. हाय होल्टेज ड्रामा सामान्य माणसाला न कळणारे असून भाजप याचा निषेध करते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करते, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकिय वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात सगळेच पॅरामीटर बदलत चालले आहेत. सत्तेत असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्था हाता घेणे हा त्याचाच प्रकार आहे. मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला, पोलखोल यात्रेच्या रथावर दगडफेक असेल, आज राणा यांच्या घरासमोर जो ड्रामा चालला आहे. हा हाय होल्टेज ड्रामा आहे. नवनीत राणा व रवी राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले असून त्यांनी बॅरेकेट तोडले आहेत. हे सर्वसामान्य माणसाला न पटणारे असून याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करते.

राणा दांपत्य मातोश्रीवर येणार असतील तर तेथे संरक्षण देणे हे पेलिसांचे काम आहे. मोहित कंबोजवर हल्ला, पोलखोल यात्रेवरील हल्ला, राणा कुटुंबांच्या घरासमोर चाललेला 'शो' याचा आम्ही निषेध करतो. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. अकोल्यातील कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही टाकले म्हणून त्यांच्या घरात घुसून शिवसैनिकांनी दमबाजी केली. काय चाललय हे सगळे हुकुमशाही आली काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध करण्यासारखे काय, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, राणा कुंटुंबियाने हनुमान चालिसा म्हणण्याची भूमिका घेतली होती. त्यावर मातोश्रीतून त्यांना आता घेऊन या खुर्चीत बसा, त्यांच्या प्रसादाची व्यवस्था करायला हवी होती. हनुमान चालिसा म्हणणे म्हणजे ती काय काय राक्षस चालिसा नाही. आपण सर्वजण मारूतीचे भक्त असून ते शक्तीचे माध्यम म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. त्यांनी हनुमान चालिसाचे स्वागत करायला हवे होते. तसेच पोलिसांना सांगायचे सोडून आपले कायकर्ते बोलावून विरोध केला जात आहे. यातून एका बाजूला सत्तेच्या माध्यमातून दडपशाही, दादागिरी सुरू असून दुसऱ्या बाजूला केडर रस्त्यावर उतरवले जात आहे.

अमोल मिटकरी ब्राम्हण समाजावर बोलले, याविषयी ते म्हणाले, मिटकरी कै. बाळासाहेब ठाकरेंवर बोलले होते हे त्यांना आज आठवत नाही का, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली. राणांच्या बाहेर शिवसैनिकांचा राडा आहे. यामध्ये राणा यांच्या बाजूने भाजपचे कार्यकर्ते कोणी दिसत नाही, असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, मुळात हे राणा दांपत्यानी पुकारलेले आंदोलन आहे. हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आम्ही सहभागी होणे आणि काहीही म्हणणे हा आमचा मुद्दाच येत नाही. त्यांनी पुकारलेले आंदोलन आहे. हनुमान चालिसा म्हणण्याला विरोध होत असताना खासदार व आमदार यांच्याशी बोलून शिवसेनेच्या नेत्यांनी ठरविले पाहिजे होते.

मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यानंतर मी त्यांच्याशी चारवेळा बोललो आहे. त्यांना आम्ही पुरेशी सुरक्षा वाढवा, हे सरकार तुम्हाला सुरक्षा देणार नाही आणि सहकार्यही करणार नाही, असे सांगितले. असले भ्याड हल्ले ही त्यांचीच परंपरा आहे. इतकी दडपशाही आहे की कोल्हपूरात एका कार्यकर्तीने जेवण दिले म्हणून तिला घर सोडायला लावले, इतकी त्यांची दडपशाही आहे.

राणा कुटुंबिय म्हणतात की या प्रकारात पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांनी लक्ष घालावे व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी याविषयी तुमचे मत काय, यावर ते म्हणाले, मुळात महाविकास आघाडीच्या पोटात त्याचीच भिती आहे. पण, आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. फसवणूक करून निवडुन आलेल्या सरकारवर कारवाई करण्याची गरज नाही. ती मागणी सामान्य माणसाने करावी. दरेकर म्हणतात राष्ट्रपती राजवट लागू करावी, याविषयी तुमचे मत काय, ते म्हणाले, ते शिष्टमंडळासोबत राज्यपालांना भेटल्यानंतर विविध गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

राष्ट्रपती राजवटीची मागणी नागरीकांची असेल तर आमचा त्याला पाठींबा असेल. पण हा मुद्दा आम्ही लावून धरणार नाही. सर्वस्तरावर महाराष्ट्राच्या परंपरेचे धज्जे उडाले आहेत. त्यामुळे त्यावर कोणीही म्हणेल राष्टपती राजवट लागू करावी. गृहमंत्री म्हणता की कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, याविषयी श्री. पाटील म्हणाले, या सर्व घटना पाहता गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा.

लोडशेडिंगविषयी ते म्हणाले, भाजपच्या पाच वर्षाच्या कालावधीत कधीही लोडशेडिंग करावे लागले नाही. आता शहरी व ग्रामीण भागात लोडशेडिंग केल्याने पीके करपून जाणार आहेत. हे विजेचे कृत्रिम संकट आहे. खासगी विज विकत घेण्याचे कारस्थान असून याविरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराला भाजपचे समर्थन व फुस आहे, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, गृहमंत्रालय तुमचे आहे, तु्म्हच शोधून काढा व शिक्षा करा. उद्या कोणी म्हणेल की कडक ऊन पडले म्हणून भाजप जबाबदार आणि त्यानंतर पाऊस झाल्यावर अल्हाददायक वातावरण झाले त्यालही भाजप जबाबदार आहे.

राज्यातील पोलिसांवर १५ हजार कोटी रूपये खर्च केला जातो. मग याची चौकशी करा, तुमचे कार्यकर्ते सैनिक कशाला रस्त्यावर येतात. मग पोलिसस कशासाठी आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खासदार सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळेंच्या नोटीसीविषयी विचारले असता ते म्हणाले, तुमची चुक नसेल आणि नोटीसीतून काहीही निष्पन्न होत नसेल तर उत्तरे द्या, न्यायालय न्याय देईल.

कोणाला धम्या देता, करायचे ते करा...

खासदार संजय राऊत यांनी व्टिटच्या माध्यमातून आता सौजन्य व संयम सुटला आहे... असा इशारा दिला आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, कोणाला धमक्या देता, जे करायचे ते करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com