नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा

Sambhaji Brigade News : आपण संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत.
नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात नव्या राजकीय समीकरणाच्या नांदीची सुरूवात होत आहे. शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) या राजकीय पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. शिवसेनेत झालेली अभूतपूर्व बंडाळी आणि भाजप-शिंदे गटाला वाढता पाठिंबा अशा स्थितीत राज्यात एक महत्त्वाचं राजकीय समीकरण उदयाला आलं आहे. उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. (Sambhaji Brigade News)

नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा
Kirit Somaiya|महाविकास आघाडीचा आणखी एक नेता अडचणीत; सोमय्यांचे गंभीर आरोप

आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे नेते सुभाष देसाई उपस्थित होते. महाराष्ट्रात आज केंद्राकडून प्रादेशिक पक्षांना संपवून टाकण्याचा डाव सुरु आहे. शिवसेनेत या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी, व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.

नव्या राजकीय समीकरणाची नांदी : शिवसेना - संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा
Balu Dhanorkar : खासदार बाळू धानोरकर म्हणतात, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार द्या...

या लढवय्या सहकाऱ्यांचं शिवसेनेसोबत युतीसाठी स्वागत करतोय. प्रादेशिक पक्ष आणि राज्याची अस्मिता चिरडून टाकणं या प्रकाराला लोकशाही मानणारे लोकं बेताल वागत आहेत. सर्वोच्च न्यायालयात जो लढा सुरु आहे, हा केवळ शिवसेनेच्याच भविष्याचा नाही तर, देशात लोकशाही असेल की बेबंदशाही, याचा निकाल लागणार आहे. आपण संविधान वाचवण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता टिकावण्यासाठी एकत्र आलो पाहिजेत. आपण सगळे शिवप्रेमी आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ आपण सगळे एकच आहोत. मराठी माणसाला दुहीचा शाप गाढत आलाय. या शापालाच आपण गाडून टाकूत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com