Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News Sarkarnama

धक्कातंत्राच्या भीतीने इच्छुक म्हणतात,पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू

Eknath Shinde|Devendra Fadnavis : गुजरातेत एकाही मंत्र्याला पुन्हा मंत्री केले गेले नाही तर मुख्यमंत्री पटेलही अनुभव नसलेले होते.

मुंबई : दिल्लीकर भाजप श्रेष्ठी कायम धक्कातंत्राचा वापर करतात याची कल्पना असल्याने मंत्रिमंडळ प्रवेशासाठी उत्सुक असलेले नेते शांत बसले आहेत. तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. भाजप तसेच शिंदेंच्या नेतृत्वातील सेना गटातले ज्येष्ठ नेते त्यामुळे अस्वस्थ आहेत पण केंद्रातील ज्येष्ठांच्या धाकामुळे यासंदर्भात कोणीही चकार शब्द उच्चारलेला नाही.

उत्तम विषयमाहिती अन प्रशासनावरील पकडीसाठी प्रसिध्द असलेले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असलेले गिरीश महाजन, कार्यक्षमतेसाठी प्रसिध्द असलेले आशीष शेलार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपचे नेते गेल्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र यातील कुणीही आम्ही मंत्री होवू असा विश्वास व्यक्त करण्याच्या मानसिकतेत नाहीत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे या नेत्यांचे म्हणणे आहे.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
सत्ता आल्याने आमदार लांडगे यांचा `आखाड` जोरात... त्यांचा आकडा ऐकून धक्काच बसेल!

महाराष्ट्रातले आमचे सर्वाधिक ओजस्वी नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये जाणार नाही, असे जाहीर केले होते. तरीही त्यांना उपमुख्यमंत्री सांगितले गेले. त्यामुळे नेत्यांसह आम्ही सर्व आमदार जी जबाबदारी मिळेल ती निभवू अशा मानसिकतेत असल्याचे एका आमदाराने सांगितले. गुजरातेत एकाही मंत्र्याला पुन्हा मंत्री केले गेले नाही. मुख्यमंत्री पटेल हेही अनुभव नसलेले होते. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पहातो आहोत, असे पक्षातून एका सुरात सांगितले जाते आहे. शिवसेनेतील शिंदे गटाच्या एका नेत्यानेही योग्य वेळी विस्तार केला जाईल अन आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबद्दल निर्णय घेतील असे सांगितले आहे.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Ajit pawar Video: एकनाथ शिंदेंची भूक भागली नाही का?

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत 40 आमदारांसह बंड केल्याने शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा होता.

यामुळे बंडखोर आमदारांच्या साथीने स्थापन झालेल्या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेतील, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, भाजपच्या केद्रींय नेतृत्वाने राज्यातील भाजप नेत्यांसह सर्वांनाच धक्का देत शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अनेकांना धक्का बसला होता. याच भीतीने नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाची गच्छती होणार याबाबत कुणीच भाजप नेता किंवा शिंदे गटातील नेता सांगताना दिसत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com