हनुमान जन्माचा वाद अनावश्यक; महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या...

नोटबंदी Denomination केल्यानंतर केंद्र सरकारने central Government जी कारणे दिली, त्यात महागाई Inflation हे देखील एक कारण होते.
हनुमान जन्माचा वाद अनावश्यक; महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या...
Dilip Walse Patil Newssarkarnama

मुंबई : रिझर्व्ह बँकेच्या अहवालात बनावट नोटांची संख्या वाढल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे नोटबंदीच्या धोरणात केंद्र सरकारकडून चूक झालेली आहे. केंद्र सरकारने यासंबंधी भूमिका स्पष्ट करुन त्यांचे धोरण कुठे फसले? हे सांगितले पाहिजे. राम जन्म किंवा हनुमान जन्म कुठे झाला? यापेक्षा आज महागाई, बेरोजगारी, टंचाई, कोरोना असे अनेक महत्त्वाचे विषय असून हनुमानाचा जन्म कुठे झाला, हा वाद अनावश्यक आहे. त्यापेक्षा महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या, असा सल्ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोदी सरकारला दिला आहे. (Dilip Walse Patil News in Marathi)

गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला. बनावट नोटांविषयी भाष्य करताना ते म्हणाले, नोटबंदी केल्यानंतर केंद्र सरकारने जी कारणे दिली, त्यात महागाई हे देखील एक कारण होते. तसेच बनावट नोटा निकाली काढण्याबाबतही सांगितले होते. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अहवाल पाहिल्यास बनावट नोटांची संख्या वाढली असल्याचे कळते. त्यामुळे नोटबंदीच्या धोरणात केंद्र सरकारकडून चूक झालेली आहे. केंद्र सरकारने यासंबंधी भूमिका स्पष्ट करुन त्यांचे धोरण कुठे फसले? हे सांगितले पाहिजे, असे गृहमंत्री म्हणाले.

Dilip Walse Patil News
'कोव्हॅक्सिन'ला WHO चा दणका; आंतरराष्ट्रीय पुरवठ्यावर घातली बंदी, हे आहे कारण...

बनावट नोटांची समस्या ही भारतीय अर्थव्यवस्थेला अडचण निर्माण करणारी आहे. केंद्र सरकारच्या धोरणांचा हा सपशेल पराभव आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने चौकशी करुन पुढील उपाययोजना ठरविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आज जे विषय महत्त्वाचे नाहीत असे विषय काढून देशात सगळ्याच ठिकाणी वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत.

Dilip Walse Patil News
मोठी बातमी : अयोध्येतील राम मंदीर भक्तांना कधी होणार खुलं? तारीख आली समोर 

राम जन्म किंवा हनुमान जन्म कुठे झाला? यापेक्षा आज महागाई, बेरोजगारी, टंचाई, कोरोना असे अनेक महत्त्वाचे विषय आहेत. हनुमानाचा जन्म कुठे झाला? हा वाद अनावश्यक आहे. मला वाटतं याला फार महत्त्व देऊ नये. यातून कायदा व सुव्यवस्थेचा काहीच प्रश्न निर्माण होणार नाही, असेही गृहमंत्री म्हणाले.

Dilip Walse Patil News
कराद्वारे लूटणारे ठाकरे सरकार देशातील पहिले : शिवेंद्रसिंहराजेंचा घाणाघात

तसेच कर्नाटकच्या आमदाराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा झेंडा हा राष्ट्रीय ध्वज करण्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना गृहमंत्री म्हणाले, भारताचा राष्ट्रध्वज हा तिरंगा आहे आणि राहिल. कुणी काहीही म्हटले तरी भारतीय नागरिक हा तिरंगाच राष्ट्रध्वज राहावा यासाठी प्राणपणाने लढेल.

Dilip Walse Patil News
IPS कृष्णप्रकाश यांच्यावर कारवाई होणार का? वळसे पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

तर त्यांच्या सुरक्षेत वाढ करणार....

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांना धमक्या आल्या आहेत. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ''या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून जे कुणी दोषी असतील त्यांना कडक शिक्षा केली जाईल. सुरक्षेचा आढावा आम्ही अधूनमधून घेत असतो. गरज भासल्यास सुरक्षेत वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in