IPS Brijesh Singh News : आयपीएस ब्रिजेश सिंग यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील नियुक्तीने आयएएस अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण सिंह परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते.
IPS Brijesh Singh And Pravinsingh Pardeshi new Appointment
IPS Brijesh Singh And Pravinsingh Pardeshi new AppointmentSarkarnama

IPS Brijesh Singh And Pravinsingh Pardeshi new Appointment : राज्य सरकारच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (Maharashtra Institution for Transformation) म्हणजे 'मित्रा' या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण सिंह परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अत्यंत प्रभावी आणि कार्य कुशल सनदी अधिकारी अशी त्यांची कारकीर्द राहिली आहे. मे २०२० मध्ये मुंबई महापालिका आयुक्तपदावरून त्यांची बदली करण्यात आली. काही दिवस ते केंद्राच्या सेवेत रुजू होते. त्यानंतर त्यांची निवृत्ती झाली. पण आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्याने आता परदेशी राज्य सराकारमध्ये नव्याने रुजू होणार असल्याची अधिकारी वर्गात चर्चा सुरु होती. ही चर्चा खरी ठरली आहे. मित्रा संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबर२०२२ मध्ये 'मित्रा' या संस्थेची स्थापना केली होती.

IPS Brijesh Singh And Pravinsingh Pardeshi new Appointment
Pune news : नीलम गोऱ्हेंना मातृशोक; लतिकाताई गोऱ्हेंचे निधन

तर ब्रिजेश सिंह हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक होते. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र गृहरक्षक दलात महासंचालक असलेले ब्रिजेश सिंग यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव म्हणून नियुक्ती झाल्याने आयएएस केडरच्या अधिकारांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.

फडणवीस सरकारच्या मागील काळात माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक असलेल्या ब्रिजेस सिंग यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहरक्षक दलाचे महासंचालक पद देऊन काहीसे बाजूला करण्यात आले होते. नव्या सरकारच्या काळात आता थेट मुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून त्यांची बदली करण्यात आल्याने आयएएस अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in