'एका दिवसाने खूश होणार नाही; भोंग्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार'

Raj Thackeray news आज मुंबईत जवळपास नव्वद ते ९२ टक्के मशिदींवर अजान झाली नाही.
'एका दिवसाने खूश होणार नाही; भोंग्यांचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार'
Raj Thackeray news

मुंबई : आज मुंबईत जवळपास नव्वद ते ९२ टक्के मशिदींवर अजान झाली नाही. मुंबईत ११४० मशिदींवर अजान झाली नाही. त्यापैकी १३५ मशिदींवर पहाटे ५ च्या आत अजान झाली. हे यापुढे कायमस्वरुपी सुरु राहिलं पाहिजे, पण जोपर्यंत हे लाऊडस्पीकर खाली उतरत नाहीत तो पर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. याचवेळी त्यांनी ज्या मशिदींवर भोंगे लागले नाहीत, त्या मशिदींमधील मौलवींचे त्यांनी आभारही मानले आहेत.

पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. अनेक ठिकाणी माझ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहेत. पण जे कायद्याचं पालन करत आहेत त्यांना तुम्ही सजा देणार आणि जे पालन करत नाहीत त्यांना मोकळीक देणार, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच, ११४० पैकी ज्या १३५ मशिदींनी नियमांच उल्लंघन केलं त्या मशिंदीवर राज्य सरकार कारवाई करणार आहे की फक्त आमच्याच मुलांना उचलणार आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मशिदी या अनधिकृत आहेत आणि अनधिकृत मशिदींवर लागलेले भोंगेही अनधिकृत आहेत, अनधिकृत मशिदींना अधिकृत परवानगी का, असे एक ना अनेक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत. अनधिकृत मशिदींना परवानगी दिली तर त्या ठिकाणी हनुमान चालिसा वाजणार म्हणजे वाजणार .

Raj Thackeray news
अशी विधानं करताना जरा डोकं ठिकाणावर ठेवा; संजय राऊतांचा मनसेवर पलटवार

काल विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितलं की काही मशिदींमधील मौलवींनी परवानगीसाठी अर्ज केले आणि आम्ही त्यांना परवानगी दिली, पण तुम्ही ३६५ दिवसांची परवानगी कशी दिली. आम्हाला परवानगी देताना दिवसांची परवानगी देणार आणि यांना ३६५ दिवसांची का, यानीही दररोज परवानगी मागवी, आणि तेही सर्वोच्चा न्यायालयाच्या निर्णयात बसूनच. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्यणानुसार ४५ ते ५५ डेसिबलच्या मर्यागेतच परवानगी मिळणार. याच्यावर जाता येणार नाही.

मी म्हटंल होत, पहिले हे भोंगे खाली उतरवी, पण पोलिसांना डेसिबल मोजण्याचीच काम आहेत का. तु्म्हाला तुमच्या मशिदींमध्ये प्रार्थना म्हणायची आहे म्हणा पण तुम्हाला माईक, लाऊडस्पीकर लागतो कशाला. त्यामुळे आमची मागणी आहे की हे भोंगे खाली उतरवले गेल पाहिजेत आणि जो पर्यंत ते उतरवले जात नाहीत तो पर्यंत हनुमान चालिसा वाजणार म्हणजे वाजणारच, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.