50 लाखांची लाच स्वीकारणारा BMC चा 'तो' अधिकारी ACB च्या जाळ्यात...

ACB : फिर्यादीच्या कंपनीचे अनधिकृत शेड महापालिकेच्या अतिक्रमण निष्कर्षण विभागाने तोडले होते.
ACB trapp Latest News
ACB trapp Latest NewsSarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अंधेरी के/पूर्व प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील एका कंपनीच्या शेडवरील तोडक कारवाई टाळण्यासाठी 50 लाखाची लाच स्वीकारणाऱ्या पालिकेच्या लाचखोर अधिकाऱ्यास मुंबई पोलिसांच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.

काल (ता.४ नोव्हेंबर) सायंकाळी 6 वाजता ही कारवाई करण्यात आली असून अटक करण्यात आलेला अधिकारी सतीश पवार हा इमारत व कारखाना विभागात मुख्य अभियंता म्हणून काम पाहत आहे. (ACB trapp, BMC Latest News)

ACB trapp Latest News
Nawab Malik यांना ईडीचा पुन्हा दणका ; राहत्या घरासह सर्व मालमत्ता होणार जप्त

मुंबई महानगरपालिका अंधेरी के/ पूर्व विभागामध्ये कार्यरत कार्यकारी अभियंता सतीश पवार यांनी एका कंपनीची अनाधिकृत शेड न तोडण्यासाठी 50 लाखाची लाचेची मागणी केली होती. यानंतर कंपनीच्या मालकांनी मुंबई पालिकेच्या कार्यकारी अभियंता सतीश पवार विरोधात मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

ACB trapp Latest News
शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या; दहशतवादी संघटनांनी दिली होती धमकी

अंधेरी के पूर्व विभागात फिर्यादीच्या कंपनीचे अनधिकृत शेड महापालिकेच्या अतिक्रमण निष्कर्षण विभागाने तोडले होते. ते पुन्हा बांधण्यासाठी महापालिकेच्या इमारत कारखाना विभागाचे डीओ सतीश पवार यांनी पन्नास लाखाची मागणी केली होती. या विरोधात फिर्यादीने लाच लुचपत विभागाकडे तक्रार देखील केली होती.

या तक्रारीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर काल सापळा रचून आरोपी पवार यांना ठरलेली रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.आता मुंबई महानगर पालिकेच्या या अधिकाऱ्याने आणखी किती लोकांकडून अशा पद्धतीने लाच घेतली आहे याचा संदर्भात अधिक तपास सुरू केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com