अशोक चव्हाण यांच्या बाबतचे 'ते' वृत्त म्हणजे खोडसाळपणा : थोरातांचे स्पष्टीकरणं

Ashok Chavan : जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे.
Balasaheb Thorat-Ashok Cahvan Latest News
Balasaheb Thorat-Ashok Cahvan Latest NewsSarkarnama

मुंबई : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माझे सहकारी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य असून खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय असून आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत,अशी प्रतिक्रिया कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. (Balasaheb Thorat-Ashok Cahvan Latest News)

Balasaheb Thorat-Ashok Cahvan Latest News
दसरा मेळावा : शिवसेना-शिंदे गटातील वाद चिघळणार..सदा सरवणकरांचा BMC कडे अर्ज

थोरात म्हणाले की, माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही दिवसात चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भाने चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे, माध्यमांना विनंती आहे की, त्यांनी हे थांबवावे.

चव्हाण हे फक्त गणपती दर्शनानिमित्ताने त्यांच्या मित्रांच्या घरी गेले होते. यावेळी दुसरे नेते तिथे आले. मात्र त्याचा असा वेगळा अर्थ लावून आणि तर्क लावणं काही बरोबर नाही. या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले हे वृत्त हे पुर्णपणे असत्य असून खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय असून आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat-Ashok Cahvan Latest News
फडणवीस म्हणतात, मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का?

दरम्यान, काल (१ सप्टेंबर) भाजप आणि शिंदे गटात समन्वयासाठी नियुक्त करण्यात आलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि त्यांच्यात चर्चा झाली,असे बोलले गेले. यामुळे कॅाग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. सध्या सुरू असलेलं राजकारण बघता अनेक तर्क देखील लढवले जात होते. मात्र यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे थोरातांनी म्हटलं आहे.

चव्हाण हे कुलकर्णी यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले हेाते. नेमके त्याचवेळी उपमुख्यमंत्री फडणवीसही त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास राजकीय चर्चा झाल्याची चर्चा झाली. मात्र, याबाबत खुद्द फडणवीसांनीही पुण्यात स्पष्टीकरणं दिल असून अशोक चव्हाण आणि माझी भेट झाली नसून आम्ही फक्त गणपती दर्शनानिमित्त एका ठिकाणी एकत्र आलो होतो. यावेळी आमच्यात काहीही चर्चा झाली नाही. या फक्त माध्यमातील चर्चा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in