परमबीरसिंहांची चौकशी करताहेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह तब्बल सहा महिन्यांनी मुंबई दाखल झाले आहेत.
परमबीरसिंहांची चौकशी करताहेत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे
Param Bir Singh Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) तब्बल सहा महिन्यांनी मुंबई दाखल झाले आहेत. त्यांची काल गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. आज ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे (Avinash Ambure) ही चौकशी करीत असल्याचे समजते.

बांधकाम व्यावसायिक केतन टन्ना यांनी परमबीरसिंह यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दिली होती. या प्रकरणी जुलै महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. परमबीरसिंह हे 2019-2019 मध्ये पोलीस आयुक्त होते. त्यांनी आणि इतर आरोपींनी टन्ना यांच्याकडून 1.25 कोटी रुपयांची खंडणी उकळली. तसेच, टन्ना यांचे मित्र सोनू जालान यांच्याकडूनही 3 कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. या प्रकरणी परमबीरसिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आला आहे.

Param Bir Singh
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना आणलं अडचणीत; उपोषणाची थेट धमकी

परमबीरसिंह हे या प्रकरणात चौकशीसाठी आज वकिलांना सोबत घेऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात आज सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी हजर झाले. आता ठाणे पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. या पथकाचे नेतृत्व पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे करीत आहेत. विशेष म्हणजे मनसुख हिरेनचा खून उपायुक्त अंबुरे यांच्याच परिमंडळाच्या हद्दीत झाला होता.

Param Bir Singh
भावना गवळींना ईडीचा दणका! निकटवर्तीयाच्या पावणेचार कोटींच्या संपत्तीवर टाच

सुरवातीचा तपास त्यामुळे अंबुरे यांच्याच नेतृत्वाखाली झाला. नंतर तो दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) गेला. हिरेन खुन प्रकरणात बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानासमोर सोडलेली स्फोटके भरलेली एसयूव्ही हिरेन याचीच होती. नंतर ठाण्यातील खाडीत हिरेनचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी वाझेला अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in