सावधान! ठाणे महापालिका आयुक्तांच्या बोगस क्रमांकावरून होऊ शकते फसवणूक

अधिकारी व नगरसेवकांना कॉल व एसएमएस मार्फत पैशाची मागणी करण्यात येत आहे.
सावधान! ठाणे महापालिका आयुक्तांच्या बोगस क्रमांकावरून होऊ शकते फसवणूक
Cyber CrimeSarkarnama

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यामध्ये (Cyber Crime) कमालीची वाढ होतांना दिसत आहे. आता या सायबर गुन्हेगारांनी सामान्य नागरिकांबरोबरच अधिकारी आणि मोठ्या राजकीय नेत्यांनाही आपले लक्ष केले आहे. असाच काही प्रकार ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Vipin Sharma) यांच्याबाबत घडला असून त्यांच्या नावाने एक बोगस संपर्क क्रमांक तयार करून अधिकारी व नगरसेवकांना कॉल व एसएमएस मार्फत काही पैशाची मागणी करण्यात येत आहे. मात्र, या बाबत माहिती मिळाल्याने शर्मा यांनी या बोगस संपर्क क्रमांकास नागरिकांनी प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

Cyber Crime
राणांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून सेनेला डिवचले, पण टायगर अभी जिंदा है..!

आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून + ९१ ८१६७२ ८३९१० या बोगस क्रमांकावरून अधिकारी व नगरसेवक तसेच नागरिकांना संपर्क करण्यात येत आहे. यामध्ये व्हाट्सएप खाते देखील उघडण्यात आले असून यावर महापालिका आयुक्तांचा फोटो लावण्यात आला आहे. या क्रमांकावरून काही पैशाची मागणी करण्यात येत आहे. हा क्रमांक बोगस असून याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, या बोगस संपर्क क्रमांकास नागरिकांनी प्रतिसाद न देऊ नये, असे शर्मा यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Cyber Crime
हनुमान चालिसा आणि भोंग्याचे राजकारण बघून खंत वाटते…

दरम्यान, गेल्या काही महिन्यापुर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याही फोटोचा व्हॉटस्अप प्रोफाईल म्हणून वापर करण्यात आला होता. आणि त्यामार्फत ऑनलाईन चॅटींगद्वारे नगरसेवकांना फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पाटील यांच्या फेक आयडी आणि प्रोफाईलचा गैरवापर करीत अॅमेझानव्दारे भेटींची मागणी नगरसेवकांसह नागिरकांकडे सदर सायबर गुन्हेगाराने केली होती. यावेळी पाटील यांनीही नागरिकांना यापासून सावध राहण्याचा इशारा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.