मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हॉइसकॉलचा ठाकरेंच्या शिवसेनेने घेतला धसका

Thackeray-Shinde Politics| आता शिंदे-भाजप यांच्याकडून मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|

Uddhav Thackeray मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून आगामी महापालिका निवडणुकांसाठी आतापासून मोठी तयारी सुरु करण्यात आल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकना शिंदे यांचा साध्या एक ऑडियो कॉल प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल ऑडियो कॉल ला बळी पडू नका, असं ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे. हा कॉल आल्यानंतर समोरुन एक दाबण्याची सूचना करण्यात येते, पण नागरिकांनी एक दाबून नये, असे आवाहन केले आहे.

काय आहे या स्वयंचलित ऑडियो कॉलमध्ये

नमस्कार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतोय, स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी मी एक भक्कम पाऊल उचललं आहे. सुजलाम सुफलाम हे महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आपणही माझ्यासोबत सामील व्हा. सामील होण्यासाठी क्रमांक एक दाबा,'' असे आवाहन या कॉलमधून करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray| Eknath Shinde|
आम्ही एक चांगला माणूस गमावला; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

ठाकरे गटाचे आवाहन

हा ऑडियो कॉल व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून या कॉलला उत्तर न देण्याचे आणि एक क्रमांकाची कळ न दाबण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. ''शिवसेना पक्षाच्या विरोधात बंडखोरी करून महाराष्ट्र राज्याचे बेकायदेशीर मुख्यमंत्रीपद बळकावलेले गद्दार एकनाथ शिंदे यांच्या आवाजाचे स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे 911725248275 या नंबर वरुन व्हाइस Call येत आहेत. कॉल आल्यानंतर एक दाबा असे ते सूचना करत आहेत. एक दाबल्यानंतर आपण प्रणाली द्वारे त्यांच्या मिंधे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होईल. अशाच पद्धतीची यंत्रणा भाजपाच्या IT विभागाचे यांनी करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता. तरी राज्यातील तमाम शिवसेना सर्व पदाधिकारी सोशल मीडियावरील शिवसैनिक व सर्व अंगीकृत संघटना या सर्वांना विनम्र सूचना करण्यात येत आहे आहे की वरील मेसेज पूर्णपणे वाचून आपापल्या विभागातील तळातील गावापर्यंत पोहोचवावा. प्रतिसाद देऊन त्यांच्या सिस्टीमला जॉईन होऊ नये. हि नम्र विनंती. '' असे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहेे

मुंबई महापालिका गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण आता शिंदे-भाजप यांच्याकडून मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाकडून हा कॉल व्हायरल केला जात आहे. त्यामुळे या कॉलनुसार नागरिकांनी एक क्रमांकाची कळ दाबल्यास शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होईल, म्हणून एक क्रमकांची कळ दाबू नये असे आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in