शिंदे फडणवीसांना शह देण्यासाठी ठाकरेंची नवी रणनीती : असा आखलाय प्लॅन..

Uddhav Thackeray| Eknath Shinde| तेव्हापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा नवा संघर्ष राज्याच्या राजकारणात सुरु झाला आहे.
Uddhav Thackeray| Eknath Shinde|
Uddhav Thackeray| Eknath Shinde|sarkarnama

Thackeray-Shinde Politics| मुंबई : राज्यातील अभुतपूर्व सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. तेव्हापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा नवा संघर्ष राज्याच्या राजकारणात सुरु झाला आहे. भविष्यात हा सत्ता संघर्ष आणखी पेटणार असल्याची चिन्हेही दिसू लागली आहेत. गेल्या चार-पाच महिन्यांपासून शिंदे-फडणवीस विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरु असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातून फुटलेल्या चाळीस आमदारांना धडा शिकवण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वत: मैदानात उतरले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस बंडखोर आमदारांना शह देण्यासाठी आता उद्धव ठाकरेंनी नवी रणनीती आखली आहे. 'मिशन ४०' अंतर्गत चाळीस आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. याचाच एक भाग म्हणजे यवतमाळच्या संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांना पुढे आणले आहे. अशाच प्रकारेइतर जिह्यातही बंडखोर आमदारांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून तगड्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.

या दृष्टीने आता उद्धव ठाकरेंनी लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. बंडखोर आमदारांवर मात करण्यासाठी तगड्या उमेदवारांची आतापासूनच चाचपणी सुरु करण्यात आली आहे. पक्षातून बंडखोरी केलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयातील लढाई जिंकण्यासाठीही कंबर कसली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पक्षाला बळ देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे चांगलेच सक्रिय झाले आहेत. आदित्य ठाकरे या बंडखोर आमदारांच्या विरुद्ध सातत्याने आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे पिता-पुत्र आता नव्याने पक्षाची बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com