मुख्यमंत्री शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंची मोठी खेळी; केदार दिघेंना दिली ठाण्याची जबाबदारी

Uddhav Thackeray|Kedar Dighe : नरेश मस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप 'मातोश्री'कडून या पदावर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती.
Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News Sarkarnama

ठाणे : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केदार यांच्या नियुक्तीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धक्का दिला असल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीची माहिती शिवसेनेचे सचिव विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली आहे.

Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
..तर संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत असेल...

ईडीने शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले असतांना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यात शह देण्यासाठी मोठी चाल खेळत ठाण्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणुक जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंवर बंड केल्यानंतर टीकेची झोड उठवणारे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याचा जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. केदार दिघे यांच्या नियुक्तीने ठाकरेंनी शिंदेंना ठाण्यातच घेरण्याचा प्लॅन केला आहे. शिंदे हे आनंद दिघे यांचा स्वत:ला शिष्य समजतात आणि त्यांच्या विचाराने आपण शिवसेनेला पुढे घेऊन जाणार,असे शिंदे वारंवार सांगत असतात. मात्र आता त्यांचा ठाण्यातच सामना केदार यांच्याशी होणार असल्याने केदार यांच्यावर टीका करण्यासाठी शिंदेंची अडचण होऊ शकते. यामुळे हा शिंदेंना धक्का मानला जात आहे.

Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
राऊतांवरील कारवाई अन् मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा; केसरकरांनी स्पष्टच सांगितले

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, केदार दिघेंची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून अनिता बिर्जे यांना उपनेत्या हे पद दिले आहे. तर प्रदीप शिंदे यांची ठाणे शहरप्रमुखपदी वर्णी लागली आहे. याबरोबरच चिंतामणी कारखानीसांची ठाणे जिल्ह्या विभागीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
शिंदेंच्या बंडानंतर विचारेंनी पहिल्यांदाच स्पष्टच सांगितले; म्हणाले...

दरम्यान, ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा नरेश मस्के यांनी राजीनामा दिल्यानंतर अद्याप 'मातोश्री'कडून या पदावर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती. मात्र आता केदार दिघे यांची ठाणे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केदार दिघे हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते. त्याच बरोबर बंडखोर शिंदे गटाचा समाचार ते वेळोवेळी घेत होते. आता शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने केदार यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने ठाण्यात शिंदे विरूध्द दिघे हा सामना बघायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in