Thackeray Vs Shinde : शिवसेना फुटल्यानंतर पहिल्यांदाच शिंदेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे दाखल होणार!

Thackeray Vs Shinde : ठाण्यातल्या आनंदमठात आनंद दिघेंना श्रद्धांजली वाहणार!
Thackeray Vs Shinde : Eknath Shinde : Uddhav Thackeray
Thackeray Vs Shinde : Eknath Shinde : Uddhav Thackeray Sarkarnama

Thackeray Vs Shinde : शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात दाखल होणार आहेत. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाकरेंची ठाण्यामध्ये एंट्री होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून शिंदेच्या गडामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे शिंदे संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

उद्धव ठाकरे ठाण्यात येऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील तलाव पाळी भागात आयोजित वैद्यकीय शिबीराला भेट देतील. या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे ठाण्याच्या आनंद-आश्रमात येऊन शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना पुष्पहार अर्पण करत, त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

Thackeray Vs Shinde : Eknath Shinde : Uddhav Thackeray
Raut VS Kesarkar : दीपक केसरकरांनी खुर्चीसाठी नारायण राणेंची लाचारी पत्करली : खासदार राऊतांचा हल्लाबोल

ठाकरेंच्या ठाणे दौऱ्याचा कार्यक्रम :

ठाकरे हे दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान ठाकरे गट आयोजित महाआरोग्य शिबिरामध्ये येणार आहेत. दुपारी 12.50 सुमारास ठाकरे टेंभी नाक्यावरच्या दिघेंच्या आनंदमठाला भेट देणार आहेत. दुपारी 1.15 च्या दरम्यान ते चरई जैन मंदिरालाही भेट देणार आहेत. दुपारी 1.45 ते 2.30 हा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा मुंबईच्या दिशेने परततील.

यापूर्वी नवरात्र उत्सवादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या ठाण्यातील टेंभी नाका परिसरात प्रसिद्ध असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी ही शिवसेना ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले होते. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत सर्वात मोठा राजकीय भूकंप घडून आला. यानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील बहुतांश पदाधिकारी आणि शिवसेना नेते शिंदे गटात गेले.

Thackeray Vs Shinde : Eknath Shinde : Uddhav Thackeray
Kolhapur News : गोकुळ दूधसंघ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय : ठाकरेंना दिलासा तर शिंदे-फडणवीस सरकारला झटका!

एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाचं मध्यवर्ती कार्यालयसुद्धा ठाण्यातच आहे. ठाणे आणि शिवसेनेचं समीकरण वेगळं होतं. शिवसेनेचा पहिला-वहिला महापौर ठाण्यातूनच झाला होता. यानंतर ठाण्यात अनेक वर्षे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता राहिली आहे. पण शिंदेंच्या बंडानंतर परिस्थिती बदललेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com