Thackeray Vs Shinde : ''...तर शिंदे गटाचे वकीलही मीच मुख्य नेता असल्याचा दावा ठोकतील! ''

Anil Desai : निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात गेला तर...
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Uddhav Thackeray & Eknath Shinde News : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाने दावा ठोकला होता. यावर ठाकरे गटानं शिंदे गटाचा दाव्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाचं यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी दोन्ही गटातील नेते आयोगात दाखल झाले आहे. मात्र, या सुनावणीआधी ठाकरे गटाचे नेते व खासदार अनिल देसाई यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे.

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले, शिंदे गटाच्या वकिलांनी मागच्यावेळी हास्यास्पद दावा केला होता. ज्या लोकांना पक्षातून बाद केलेलं आहे. ते लोक पक्षावर दावा करत असतील तर हे हास्यास्पद असून उद्या शिंदे गटाचे वकीलही मीच मुख्य नेता असल्याचं दावा ठोकतील,पण त्यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही अशा शब्दांत देसाई यांनी शिंदे गटाची खिल्ली उडवली आहे. तसेच निवडणूक आयोग नियमांनुसार काम करते ते योग्य निर्णय देतील असा विश्वासही देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

Eknath Shinde
30-30 Scam : लक्की नंबर म्हणून ग्रुपचे नाव तीस-तीस, राठोड गोणी भरून पैसे वाटायचा..

शिंदे गटानं न्यायालयात केलेल्या दाव्यावर भाष्य करताना अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले, मागील सुनावणी दरम्यान शिंदे गटाच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे आम्ही आजच्या सुनावणीदरम्यान खोडून काढणार आहोत. त्यांच्या मुद्द्यांमध्ये तथ्य नव्हते हेही आपल्या लक्षात येईल. ज्याला कायद्याचे ज्ञान आहे किंवा ज्याला समज आहे त्याला देखील समजून येईल की, त्यांच्या मुद्द्यात दांभिकता होती. आज या सर्व गोष्टींचं निराकरण होईल असेही ते म्हणाले.

Eknath Shinde
Karnataka News : कर्नाटकसाठी भाजपने परंपरा मोडली, निवडणुकांचा भार पुन्हा येदीयुरप्पांवर!

संपूर्ण गटाच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. त्याचा निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगानं सुनावणी घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाचा निर्णय विरोधात गेला तर सुप्रीम कोर्टाचा पर्याय आमच्यासमोर आहेच. पण तरीही विषय त्या त्या ठिकाणीच सोडवले जावेत अशी आमची धारणा असल्याचेही देसाई म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत हे मान्य केलं...

बेकायदेशीर लोक नेहमी कायदेशीर असल्याचे भासवतात असा टोला लगावतानाच अनिल देसाई यांनी शिंदे गटांच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे हास्यास्पद आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका बैठकीला हजर राहिले नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी मागे सांगितले होते. याचा अर्थ त्यांनी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, हे मान्य केले आहे असा चिमटाही शिंदे गटाला काढला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाळ संपत आलेला आहे. त्यामुळे पक्षप्रमुखाची निवडणूक घेण्यास मुभा द्यावी किंवा मग पक्षप्रमुखाचा कार्यकाळ वाढवून मिळावा, अशीही मागणी करणार असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in