मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्याच्या विरोधातील 'त्या' फेसबुक पोस्टवरून ठाकरे समर्थक शशांक यांना अटक

Shivsena : देवेंद्र फडणवीस यांचा फॅमिली सोबतचा फोटो अपलोड केला आहे.
Shivsena,Dombiwali, Crime News
Shivsena,Dombiwali, Crime NewsSarkarnama

डोंबिवली : शिवसेना शाखांवरुन सध्या ठाकरे आणि शिंदे गटात वादावादी सुरु आहे. हा वाद शमत नाही तोच फेसबुक पोस्टवरुन शिंदे व ठाकरे समर्थक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.

उद्धव ठाकरे समर्थक शशांक माणगावकर यांनी फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो अपलोड करीत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला असल्यााची तक्रार शिंदे समर्थकांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात करताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत शशांक याला अटक केली आहे. या घटनेमुळे शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. (Shivsena,Dombiwali, Crime News)

Shivsena,Dombiwali, Crime News
Marathwada : शिवसेनेत चाललंय काय? खैरेंकडून `ते` विधान मागे, दिलगिरीही व्यक्त..

डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर पोलिस ठाण्यात शिंदे समर्थक तथा उपशहर प्रमुख संतोष चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. 4 नोव्हेंबर) रात्री उशीरा शशांक माणगावकर याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार शशांक याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतात काम करतानाचा फोटो अपलोड केला आहे.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फॅमिली सोबतचा फोटो अपलोड केला असून याला त्यासोबत बदनामीकारक मजकूर पोस्ट केला. यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता आहे, अशी तक्रार दाखल केली आहे.

दाखल तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिस ठाण्यात शशांक याच्या विरोधात बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शनिवारी (ता.५ नोव्हेंबर) पोलिसांनी शशांक याला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिली.

Shivsena,Dombiwali, Crime News
Shivsena : जिल्ह्यातील नेत्यांचे अपयश, सभा रद्द झाल्याने आदित्य ठाकरे तोंडघशी ..

ही फेसबुक पोस्ट सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे शिंदे व ठाकरे समर्थकांमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे समर्थकांनी मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे समर्थकांमध्ये चिड निर्माण झाली असून समाज माध्यमावर त्याचे पडसाद उमटत आहेत.

तोच मुख्यमंत्री हे त्यांच्या गावी शेतात काम करत असतानाचे काही फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले होते. हेच फोटो वापरत शशांक यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फॅमिली सोबतचा एक फोटो पोस्ट करत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे. पोलिसांनी शशांक याला अटक केली असून हा वाद आणखी चिघळू नये यासाठी लक्ष ठेवून आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in