Uddhav Thackeray| Narayan Rane|
Uddhav Thackeray| Narayan Rane|

शिंदेप्रमाणे राणेंनाही मारण्यासाठी ठाकरेंनी सुपाऱ्या दिल्या होत्या..; नितेश राणेंचा आरोप

Narayan Rane| Uddhav Thackeray| 'एखाद्याने काही कारणामुळे शिवसेना सोडली तर त्या व्यक्तीसोबत काय केलं जातं ते महाराष्ट्राला माहित असायला पाहिजे

मुंबई : शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे-शिंदे संघर्ष शिगेला पोहचला आहे. शुक्रवारी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर तर हे वातावरण आणखीनच चिघळले आहे. त्यात आता पुन्हा राणे-शिवसेना वादाचीही ठिणगी पडली आहे. भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) धक्कादायक आरोप केला आहे.

Uddhav Thackeray| Narayan Rane|
मी निवडणूक लढवावी की नाही हे जनताच ठरवेल!

- नितेश राणेंचे ट्विट

''एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच जेव्हा माझ्या वडिलांनी शिवसेना सोडली तेव्हा विवेकी आणि सभ्य दिसणाऱ्या पक्षप्रमुखांनी त्यांना मारण्यासाठी अनेकांना सुपाऱ्या दिल्या होत्या. असा धक्कादायक आरोप नितेश राणे यांनी ट्विटमधून केला आहे. इतकेच नव्हे तर, जरा ही म्याँव म्यांव संपू दे त्यानंतर आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू. सगळ्या गोष्टींची सव्याज परतफेड केली जाईल, असा इशाराही राणेंनी दिला आहे.

- नितेश राणे काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ''एखाद्याने काही कारणामुळे शिवसेना सोडली तर त्या व्यक्तीसोबत काय केलं जातं ते महाराष्ट्राला माहित असायला पाहिजे. आत्ता त्यांचे सुपुत्र महाराष्ट्रभर फिरून उद्धव ठाकरे किती चांगले आहेत, हे सांगतायेत. पण त्यांची खरी बाजूही लोकांना कळली पाहिजे. स्वतःचे वडील आजारी असल्याची त्यांना चिंता वाटते, मग दुसऱ्यांच्या वडिलांना जेवत्या ताटावरुन उठवलं ते हे लोक विसरून गेले का, नारायण राणेंना अटक करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आता योग्य वेळी माहिती आहे ती लोकांसमोर येईलच, असंही राणेंनी म्हटलं आहे.

- सुहास कांदेंचे आरोप

सुहास कांदे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला. पण "एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडेआठवाजता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी म्हटलं होत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in