अंधेरी पोटनिवडणुकीत ट्विस्ट : अर्ज माघारीसाठी दबाव टाकला; अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीची आयोगाकडून दखल

निवडणूक आयोगाने कांबळे यांच्या पत्राची दखल घेतली असून ते काय निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Milind Kamble-Uddhav Thackeray
Milind Kamble-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (By Election) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण, या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणारे मिलिंद कांबळे (Milind Kamble) यांनी अर्ज माघारी घेण्यासाठी आपल्यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाकडून दबाव टाकण्यात आला, अशी तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) करत ही पोटनिवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कांबळे यांच्या पत्राची दखल घेतली असून ते काय निर्णय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Thackeray group pressured me to withdraw application : Milind Kamble)

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसे धमकीही देण्यात आल्याचा आरोप मिलिंद कांबळे यांनी केला होता. याशिवाय अन्य अपक्ष उमेदवारांवर देखील दबाव टाकून त्यांना देखील निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले, त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी तक्रार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Milind Kamble-Uddhav Thackeray
'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. आता आयोग यासंदर्भात काय भूमिका घेतो, हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, याप्रकरणी कांबळे यांनी वर्षा येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गटाचीही पोटनिवडणुकीसंदर्भात काय भूमिका असणार, याची उत्सुकता आहे.

Milind Kamble-Uddhav Thackeray
निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत नाराजीचा लेटरबॉम्ब : आमदार बनसोडेंना डावलले जात असल्याचा आरोप

दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके आणि भाजपकडून मुरजी पटेल यांनी अर्ज भरले होते. मात्र, भापजने या निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे या निवडणुकीतील चुरस संपली होती. मात्र, अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्या तक्रारीमुळे या पोटनिवडणुकीत पुन्हा ट्विस्ट आला आहे. आता लक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com