STच्या बाराशे जणांची सेवासमाप्ती ; ठाकरे सरकार आक्रमक

पगारवाढ देऊनही कर्मचारी संप करण्यावर ठाम असतील तर पैसे न देता त्यांना संप सुरु राहिला तर त्यात वाईट काय आहे? असा विचार सरकारला करावा लागेल, असा इशाराअनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे.
Anil Parab
Anil Parabsarkarnama

मुंबई : , एसटीच्या ३१५ बसेस रस्त्यावर सध्या धावत आहेत, सुमारे २० हजार कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती एसटी (ST) महामंडळाकडून देण्यात आली असली तरी आझाद मैदानावर एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. 'विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नाही,' अशी भूमिका त्यांनी घेतली होती. संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा परिवहन मंत्री अनिल परब यांनी उगारण्यास सुरवात केली आहे.

पगारवाढ देऊनही एसटी कर्मचारी संप करण्यावर ठाम असतील तर पैसे न देता त्यांना संप सुरु राहिला तर त्यात वाईट काय आहे? असा विचार राज्य सरकारला करावा लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. त्या दृष्टीने पावलेही टाकण्यास सुरुवात झाली आहे.

Anil Parab
शिवसेनेचे माजीमंत्री अर्जुन खोतकरांची ईडीकडून बारा तास चौकशी

राज्य सरकारने पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत संपात सहभागी असलेले सुमारे वीस हजार कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. कामावर हजर न झालेल्या 3215 कर्मचाऱ्यांना सरकारने आतापर्यंत कामावरुन निलंबीत केले आहे. तर 1226 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे हा संप आता पुढे कोणत्या स्तरावर जाणार याबाबत उत्सुकता आहे.

अनिल परब म्हणाले की, राज्य सरकारनेही एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना आणि योग्य मागण्या विचारात घेऊन पगारवाढ केली आहे. असे असले तरीही काही कर्मचारी संपावर टाम आहेत. त्यामुळे पेसै (पगारवाढ) देऊनही एसटी कर्मचारी संप करण्यावर ठाम असतील तर पैसे न देता त्यांना संपू सुरु राहिला तर त्यात वाईट काय आहे? असा विचार राज्य सरकारला करावा लागेल.

परब यांनी संपकरी कामगारांना शुक्रवार सकाळपर्यंत अल्टिमेटम दिला. त्याप्रमाणे महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील २१ डेपो अंशतः सुरु झाले असून सुमारे १३ हजार कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. संप निवळत असल्याची ही चिन्हे दिसत आहेत.

''कामगार न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर आमच्याकडं तरतूद आहे की, एक दिवस गैरहजेरीच्या बदल्यात ८ दिवसांचा पगार कापावा. कामगारांनी याचा विचार करावा, आमची तशी इच्छा नाही. 'नो वर्क नो पे' हे तर करणारच कारवाईला भाग पाडू नका,'' असे परब यांनी शुक्रवारी कामगारांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com