Thackeray-Ambedkar Alliance : मुंबई महापालिकेसाठी ठाकरे-आंबेडकर युती कितपत फलदायी ठरणार?

Shivsena-VBA Alliance : "शिवशक्ती-भीमशक्तीचा एक अनोख्या राजकीय समीकरणाचा प्रयोग करण्यात आला होता."
Thackeray-Ambedkar Alliance :
Thackeray-Ambedkar Alliance : Sarkarnama

Shivshakti-Bhimshakti: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेने ठाकरे गटासोबत युती करणार असल्याचे जाहीर केले आहे. आता ही युती अधिकृतपणे पूर्णत्वाला जात आहे. परंतु या युतीचा ठाकरे गटाला मुंबई महापालिकेच्या दृष्टीने फायदा होईल का? यामुळे शिवसेनेची फुटीनंतर हे नवे राजकीय समीकरण ठाकरे गटाला तारणार का? याबाबत विविध मत-मतांतरे व्यक्त होत आहेत.

मुंबईत आंबेडकरी विचारांची एक ठराविक मतपेढी आहे. मात्र ही मतपेढी विविध आंबेडकरी नेत्यांमध्ये विखुरलेली असल्याचे मागील अनेक निवडणुकांमधून दिसून आले आहे. मुंबईपुरता विचार करायचा झाल्यास इथे कोणत्या आंबेडकरी अधिक ताकदवान आहे, असा प्रश्न उपस्थित झालेला दिसून येतो.

मुंबईत रामदास आठवले यांचा रिपल्बिकन पक्ष की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिक, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला जिल्ह्यात अधिक लक्ष दिलेले दिसून येते. अकोल्यात वंचित हा बलवान पक्ष आहे. अकोल्याची जिल्हा परिषद वंचितच्या ताब्यात आहेत. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत वंचितच्या दोन आमदारांचा प्रवेशही झाला होता. मात्र अकोला जिल्हा व्यतिरिक्त वंचितची उर्वरित महाराष्ट्रात ताकद अद्याप पर्यंत आढळून आलेली नसली, तरी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये त्यांची मते इतर पक्षांसाठी विजय आणि पराभवासाठी निर्णायक ठरले.

Thackeray-Ambedkar Alliance :
Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

रामदास आठवले यांच्या गटाचा मुंबई, ठाणे, नवी मुंबईवर व इतर शहरी भागांवर काही अंशी प्रभाव राहिला दिसून येतो. आठवले यांच्या पक्षाला विविध निवडणुकांमध्ये एका सीमेपर्यंत यश मिळालेले दिसते. मुंबईच्या, तसेच इतर शहरी भागांच्या दलितबहुल भागांमध्ये आठवले यांच्या पक्षाचा काही अंशी प्रभाव आढळून येतो. मुंबईच्या अनेक महापालिका वॉर्डात ही मते निकालावर परिणाम घडवून आणून ती निर्णायक ठरतात. आठवलेंचं एक जुनं वक्तव्य प्रसिद्ध आहे. ते म्हणतात, "आम्ही निवडून येत नाही, पण कोणाला निवडून आणयचं आणि कोणाला पाडायचं हे मात्र ठरवतो."

2012 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशक्ती-भीमशक्तीचा एक अनोख्या राजकीय समीकरणाचा प्रयोग करण्यात आला होता. यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबत राजकीय घरोबा केला होता. या निवडणुकीच्या निकालाची विशेष बाब म्हणजे, आठवले गटाची मते ही शिवसेनेच्या पारड्यात पडली होती.

Thackeray-Ambedkar Alliance :
Sanjay Shirsat : बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारलं पाहिजे..

तोंडावर असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट हे राजकीय समीकरण मुंबईच्या महत्त्वाच्या निवडणुकीत किती प्रभाव पाडणार यावर अनेकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. प्रकाश आंबेडकर यांना एक प्रगल्भ राजकरणी म्हणून त्यांना मानणारा एक वर्ग आहे. पण मुंबईच्या निवडणुकीत याचा मत आणि अंतिमत: निकालावर याचा कितपत प्रभाव पडणार हे आताच निवडणुक पूर्व सांगणे कठिण दिसते. मात्र याचा शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीसाठी आणि एकूणच या नव्या राजकीय समीकरणासाठी काही सकारात्मक परिणाम घेऊन येणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in