ठाकरे सरकारनं मंजूर केलेल्या सर्व निविदा शिंदे सरकारकडून रद्द

ठाकरे सरकारने ४०३७ कामांच्या काढलेल्या सर्व निविदा शिंदे सरकारने रद्द केल्या आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्र स्वीकारल्यानंतर निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. आरे कारशेडबाबतचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी घेतलेला निर्णय त्यांनी रद्द केला होता. त्यानंतर दुसरा एक महत्वाचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला आणखी एक दणका दिला आहे. जिल्हा नियोजन निधीच्या पाठोपाठ जलसंधारण विभागाची कामे शिंदे सरकारने थांबवली आहेत. या कामाबाबत नव्याने काढलेल्या सर्व निविदा रद्द करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने ४०३७ कामांच्या काढलेल्या सर्व निविदा शिंदे सरकारने रद्द केल्या आहेत.

राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिवसेना-भाजपा युतीचे सरकार 2019 साली गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात सरकार स्थापन केले होते. या महाविकासआघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली होती.

Eknath Shinde
शिवसेनेचा गद्दारांना दणका ; विजय चौगुले, नाहटा यांची हकालपट्टी, खोतकर उपनेतेपदी

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची माध्यमांत आणि समाजमाध्यमांमध्ये स्थगिती सरकार अशीही संभावनाही केली जात असे.आता त्याच स्थगित केलेल्या निर्णयांची वाट पुन्हा मोकळी करण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुरू केले आहेत.यात प्रामुख्याने आरेत मेट्रो कारशेड आणि जलयुक्त शिवार योजना सुरू करण्याचे निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे आता राज्यातील मंत्रीमंडळात देखील बदल होणार आहेत. प्रत्येक जिल्हांसाठी आत नवीन पालकमंत्र्यांची (Guardian Minister) निवड होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समित्यांचेही पुनर्गठण करण्यात येणार असून या नवीन समित्यांनी मान्यता दिली तरच एक एप्रिलनंतर मंजूर कामांना निधी मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास (Special Protocol) करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde) यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in