गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला प्रति टन दहा रुपये..

महामंडळास जी रक्कम जमा होईल त्या रक्कमेच्या सम प्रमाणात राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल. (Dhnanjay Munde)
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला प्रति टन दहा रुपये..

Dhnanjay Munde

Sarkarnama

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मूर्त स्वरूप घेत असलेल्या स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खाजगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड (Dhnanjay Munde) कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. (Maharashtra)

सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्याने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एफआरपीच्या रक्कमेतून एकही रुपया कपात न करता संबंधित कारखान्याने त्यांचे नफा-तोटा खाते दर्शवून त्यातून ही रक्कम जमा करावयाची आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाही, असे या शासन आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ३१ डिसेंबरपर्यंत झालेल्या गाळपावरील रक्कम १५ जानेवारीपर्यंत जमा करावी तसेच १ जानेवारी पासून ते गळीत हंगाम संपेपर्यंत होणाऱ्या गाळपावरील रक्कम हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत त्या कारखान्यांना जमा करावी लागणार आहे. दोन टप्प्यात कारखान्यांकडून निधीचे संकलन करण्यात येईल.

सहकार विभाग व राज्य साखर आयुक्त हे प्रत्येक कारखान्याने एकूण गाळप केलेला ऊस व त्यानुसार जमा होणारी रक्कम याचा अनुषंगिक तपशील पडताळणी करून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागास उपलब्ध करून देतील, असाही उल्लेख या शासन निर्णयात करण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Dhnanjay Munde</p></div>
जनतेचे आशिर्वाद, पुण्य कर्मामुळेच पंतप्रधान मोदी मोठ्या संकटातून वाचले..

राज्यातील प्रतिवर्षी गाळप होणाऱ्या ऊसाच्या प्रमाणात महामंडळास जी रक्कम जमा होईल त्या रक्कमेच्या सम प्रमाणात राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल; ही संपूर्ण रक्कम ऊसतोड कामगार, त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मुलांच्या उन्नतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून महामंडळामार्फत खर्च केली जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.