मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली भाजपने; पुजेसाठी मात्र मंत्री धावले!

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून सर्वच धार्मिक स्थळी शिस्तबद्धरीत्या दर्शनाची व्यवस्था केली आहे.
मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने केली भाजपने; पुजेसाठी मात्र मंत्री धावले!
Uddhav Thackeraysarkarnama

मुंबई : राज्यातील धार्मिक स्थळे खुली केल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांनी देवदर्शन घेतले. उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत आज मुंबादेवीचे दर्शन घेतले.

कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून सर्वच धार्मिक स्थळी शिस्तबद्धरीत्या दर्शनाची व्यवस्था केली आहे. परिसराची स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतुनाशकांचा वापर करणे असे केले. तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असे सांगून ठाकरे यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड आणि तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्दल कौतुक केले.

Uddhav Thackeray
पहिल्याच कॅबिनेटमध्ये मोदींनी राणेंना दिला होता 'हा' सल्ला

कोरोनामुळे राज्यातील मंदिरे अनेक दिवस बंद होती. मंदिरे उघडण्यासाठी भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन केले होते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना, राज्य सरकारने गुरुवार पासून मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. मंदीर उघडण्यासाठी भाजपने आंदोलन केले आणि मंदिरे खुली होताच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दर्शनासाठी हजेरी लावली.

Uddhav Thackeray
मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे दसरा-दिवाळीसाठी मोठे गिफ्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पशू व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्यासह अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी माहीम दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले तर राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी चैत्यभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीतील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर उघडायला उपस्थित राहून दर्शन घेतले.

Related Stories

No stories found.