दसऱ्याच्या मुहूर्तावर आणखी एका ठाकरेची राजकारणात एन्ट्री...

Tejas Thackeray| शिवसेनेत फुट पडल्यानंतरही पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तेजस ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करणार असे बोलले जात होते
Tejas Thackeray in Politics
Tejas Thackeray in Politics

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना शिंदे गटात वाद सुरु असतानाच आता शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी पोस्टर प्रसिद्ध केले असून या पोस्टरवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह तेजस ठाकरे यांचाही फोटो आहे. शिवसेनेच्या पोस्टरवर तेजस ठाकरे यांच्या फोटोमुळे पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्यावर्षीही सुरु होत्या. त्यानंतर शिवसेनेत फुट पडल्यानंतरही पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तेजस ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश करणार असे बोलले जात होते, पण त्यांनी केव्हा राजकारणात यायच, हा निर्णय तेजस ठाकरेच घेतील, असे शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात आले.

Tejas Thackeray in Politics
Shivsena : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार ; दुसरा पर्याय मान्यच नाही..

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेत सतत वादाच्या ठिणग्या पडत आहेत. शिवसेना आमचीच असा दावा शिंदे गटाकडून वारंवार केला जात आहे. त्यातच आता शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळावा आमचाच, असा दावा केला जात आहे.

त्यातच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान ब्लॉक केला असल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असताना शिवसेनाही दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी आक्रमक झाली आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी शिवसेनेने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. दोन दिवसांत यावर निर्णय होईल, परवानगी मिळाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा देखील चंद्रकांत खैरे यांनी दिलाय.

कित्येक वर्षापासून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होतो. पण एकनाथ शिंदे यांचे बंड आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे सरकारने हे मैदान शिवसेनेला मिळू नये यासाठी गलिच्छ राजकारण सुरू केले.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. बाळासाहेबांनी घालून दिलेली त्यांची ही परंपरा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे चालवत आहे. पण ही परंपरा खंडीत करण्याचा प्रयत्न हे ईडी सरकार करत आहे. पण शिवसैनिक या सरकारला घाबरणार नाही. अशा शब्दांत खैरेंनी शिंदे गटाला ठणकावून सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in