दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार?

ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आदित्य यांच्या रुपाने राजकारणात सक्रीय झाली आहे.
दसरा मेळाव्यात तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार?
Balasaheb Thackeraysarkarnama

मुंबई : ठाकरे घराण्याची तिसरी पिढी आदित्य यांच्या रुपाने राजकारणात सक्रीय झाली आहे. आता त्यांचे लहान भाऊ तेजस यांनीही युवासेनेत सक्रीय व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांची आहे. यंदा शिवसेनेचा (ShivSena) दसरा मेळावा होणार आहे. त्यामध्ये तेजस ठाकरे (Tejas Thackeray) युवासेनेत सक्रीय होतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Balasaheb Thackeray
रुपाली चाकणकर होणार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आता राज्याचे पर्यावरणमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री आणि सेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सतत मदत करतात. सावलीसारखे त्यांच्या मागे असतात. आता तेजस यांनी युवासेनेत सक्रीय होणे हे पक्षसंघटनेला बळकटी देणारे ठरेल असे बोलल्या जात आहे. या दोघांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई युवासेनेत सक्रीय आहेत. तेजस हे अत्यंत आक्रमक नेते असून संघटनेतील प्रत्येक घटनेकडे लक्ष ठेवून असतात. मात्र, त्यांना राजकारणात रस नसल्याचेही सांगितले जाते.

Balasaheb Thackeray
शिवसेनेला धक्का; गुलाबराव पाटलांच्या मेहनतीवर काँग्रेसने फेरले पाणी

शिवसेना मेळाव्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. तेजस यांचा युवासेनाप्रवेशही अशाच चर्चांचा भाग आहे, असे एका सेनानेत्याने सांगितले. तेजस प्रत्येक बाबतीत सजग आहेत. त्यांनी सक्रीय केंव्हा व्हायचे हा त्यांचा प्रश्न आहे असेही या नेत्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in