Shivsena : शिवसेनेत आता 'तेजस पर्व'

जेव्हा ठाकरे कुटुंबियांवर Thackeray Family संकट आले. त्या त्यावेळी ठाकरे परिवारातील सदस्यांनी आई एकविरा देवीच्या Ekvira Devi पायावर माथा टेकवत साकडे घातले आहे.
Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
Aditya Thackeray, Udhav Thackeray, Tejas Thackeraysarkarnama

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणुक आणि राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष संघटना वाचविण्याचा मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. त्यासाठी श्री. ठाकरे व आदित्य ठाकरे पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी सक्रिय झाले आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत आहेत. नुकतीच त्यांनी कार्ला गडावर तसेच लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदीरात जाऊन दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकिय विघ्न दूर करण्याची प्रार्थना करत साकडे घातल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदार केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठींबा वाढत आहे. अशातच मुंबई महापालिकेची निवडणूक आणि राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना वाचविण्याचा मोठा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.

Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
Shiv Sena Vs Eknath Shinde: शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे ठाकरेंना उपयोगी पडतील?

यासाठी उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. त्यासोबतच आता शिवसेना पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे ही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेना वाचविण्यासाठी नवी खेळी उद्धव ठाकरे खेळू शकतात. आदित्य ठाकरे केंद्रीत युवासेनेवर तेजस ठाकरे लक्ष केंद्रीत करू शकतात.

Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
आदित्यंनतर आता तेजस ठाकरेंचे लॉंचिंग 

तसेच तेजसचा स्वभाव हा शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांसारखा असल्याचे स्वतः बाळासाहेबांनी एका भाषणात म्हटले होते. शिवसेनेच्या बंडखोरांचे आव्हान थोपविण्यासाठी व सेनेला नवी उभारी देण्यासाठी तेजस ठाकरेंचे सक्रिय होणे महत्वाचे मानले जात आहे. एकीकडे आदित्य ठाकरे राज्याच्या विविध भागांचे दौरे करत आहेत.

Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
शिवसेना कार्यकर्ते भाजप विरोधात पेटून उठतील!

तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी कोल्हापूर दौरा उरकल्यानंतर कार्ला गडावर जाऊन आई एकवीरा देवीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदीरात दर्शन घेत शिवसेनेवर आलेले राजकिय विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली आहे. तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांनी शिवसेना पक्ष संघटन व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडवर देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतल्याने या सर्व हालचालीला महत्व प्राप्त झाले आहे.

Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
Sangali : आदित्य ठाकरेंच्या सभेत पवारांची माणसं... गोपीचंद पडळकर

शिवसेना वाचविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे कनिष्ट चिरंजीव तेजस ठाकरे हे राजकारणात सक्रिय होऊ शकतात. तेजस ठाकरे यांच्या भोवती 'ठाकरे ब्रँड'चे वलय असून शिवसैनिकांत त्यांच्याविषयी प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे शिवसेना संकटात असताना तेजस ठाकरे सक्रिय होणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
PMC Election 2022 : चार सदस्यीय प्रभागरचनेच्या विरोधात राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात जाणार !

यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र, तसे घडले नाही, काही मोजक्या राजकिय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूरच असल्यचे दिसून आले होते. मात्र, आता शिवसेनेची मातब्बर नेते मंडळी सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करून शकतात, अशीही चर्चा सुरू आहे.

Aditya Thackeray, Udhav Thackeray,   Tejas Thackeray
राष्ट्रवादी नेहमीच आम्हाला आडवी गेली ; नामांतर विरोधातील याचिकेवरून शिंदे गट आक्रमक

सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेना कुणाची यावरून संघर्ष सुरू आहे. त्यातच शिंदे गट, आणि शिवसेना असे दोन गट पडले आहेत. मात्र, जेव्हा ठाकरे कुटुंबियांवर संकट आले त्या त्यावेळी ठाकरे परिवारातील सदस्यांनी आई एकविरा देवीच्या पायावर माथा टेकवत साकडे घातले आहे. त्यानंतर यश मिळाल्यावर गडावर येऊन नवस फेडल्याचेही उदाहरणे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in