Teachers Constituency News : शिंदे गटाच्या उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग ? ; राष्ट्रवादी आक्रमक

Teachers Constituency Election: कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठका सुरु आहेत.
election
election sarkarnama

Election News : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला वेग आला आहे. उमेदवारांच्या प्रचाराच्या बैठका, गाठी-भेटी सुरु आहेत. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. (Teachers Constituency news update)

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठका सुरु आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या मालकीच्या महापौर निवासात ज्ञानेश्वर म्हात्रे हे प्रचाराचे नियोजन करीत आहेत. यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

election
BRS News : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री ; BRS या माध्यमातून होतोयं सक्रीय

"या प्रकरणी चौकशी करुन संबधितांवर गुन्हे दाखल करावेत," अशी मागणी परांजपे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला निवेदन दिले आहे. ठाण्याच्या महापौरांच्या निवासासाठी उभारण्यात आलेल्या ‘महापौर निवास’ मध्ये आचारसंहितेचा भंग केला जात आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराची आखणी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून विविध बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे परांजपे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

आनंद परांजपे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे...

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून महापौर निवास या वास्तूचा वापर करुन आचारसंहिता भंग केली जात असल्याने आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासूनचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची चौकशी करावी व संबधितावर आचारसंहिता भंगचे गुन्हे दाखल करावेत; अन्यथा, ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही आगामी ४८ तासात कारवाई न केल्यास ठाणे महापालिकेच्या आयुक्तांवर लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ च्या कलम १२९ (१) अन्वये कारवाई करण्यात यावी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com